बीडकला-संस्कृती

न्यू गणेश मित्र मंडळाचा : आदियोगी

धार्मिक देखाव्यांची संस्कृती जपत एक नवीन देखावा

गणपती विसर्जनाची एक अनोखी परंपरा

धार्मिक देखावे सादर करण्या बरोबरच आपली एक परंपराचा पायंडा पाडत उत्सवमूर्तीचे विसर्जन करायचे आणि मागील दहा वर्षापासूनच एकाच मूर्तीची दरवर्षी प्राणप्रतिष्ठा करायची आशी एक अनोखी परंपरा बीड शहरातील न्यू गणेश मित्र मंडळाने जपली आहे.


बीड शहरातील जुन्या बीडमधील प्रसिध्द विठ्ठल मंदिराच्या चौकात मागील 72 वर्षापासून अविरतपणे आपली परंपरा चालू ठेवत एक नवीन अनोखा पायंडा पाडला असून न्यू गणेश मित्र मंडळ आपली एक कायम स्वरुपी गणेश मूर्ती ठेवली असून दरवर्षी उत्सवमूर्तीचे विसर्जन करतो.


यावर्षी मंडळाने एक नवीन मोठी मूर्ती बसवली असून दहा वर्षापूर्वीच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरविले आहे. आता नवीन मूर्तीचे पुढील पाच दहा वर्षानंतर विसर्जन केले जाणार आहे तो पर्यंत उत्सवमूर्तीचे विसर्जन केले जाईल.
न्यू गणेश मित्र मंडळाने धार्मिक देखाव्यावर भर दिला आहे आणि त्यांनी आता पर्यंत केदारनाथ, वैष्णवदेवी, अमरनाथ, तिरुपती बालाजी मंदिर याचे देखावे सादर केले आहे.
व्यवसायाने सी.ए. असलेल्या गिरीष गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष गौरव शर्मा यांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यां बरोबर मिळून रात्रंदिवस काम करुन आदियोगी हा देखावा सादर केला आहे. एक नवीन कल्पना सादर करण्याची ओढ प्रत्येकाच्या कृतीत दिसून येते होती.
बीड शहरातील मानाच्या गणपतीपैकी एक असलेल्या न्यू गणेश मंडळाने आपल्याला मिळालेल्या मोठ्या जागाचा सदैव उपयोग करुन घेत भव्यदिव्य देखावे प्रत्येक वर्षी सादर केले आहे.
मागील वर्षी मंडळाने रामश्वेरम येथील मंदिराची प्रतिकृती सादर केली होती. धार्मिक देखावे सादर करण्याची मंडळाने आपली बांधलकी आणि परंपरा दोन्ही जपली आहे.
न्यू गणेश मित्र मंडळाने सादर केलेला देखावा बीडकरांच्या खूप पसंतीला पडलेला असून आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button