बीड शहरातील संत ज्ञानेश्वर नगरमधील महिलांनी पाण्यासाठी फ ोडला टाहो

बीड – बीड शहरातील संत ज्ञानेश्वर नगर कॉलनीत मागील अनेक वर्षापासून पुरवश्या दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता तर मागील काही महिन्यांपासून पाण्याचा संगीत खेळ येथे चालत होतो. याला कंटाळून या कॉलनीतील सर्व महिलांनी बीड नगर परिषदेवर रोजी हंडा मोर्चा काढून योग्य दाबाने व पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी केली व उपनगराध्य विनोद मुळूक यांना निवेदन दिले.

संत ज्ञानेश्वर नगर भागाचा पाणीपुरवठा तांत्रिक नियोजनाच्या अभावामुळे विस्कळीत झाला आहे. येथील रहिवाशांना संत तुकाराम नगरमधील व्हॉल्व्हवरुन पाणी सोडले जात असून या व्हॉल्व्हवर संत तुकारामनगर, सर्कस ग्राउंड आणि संत ज्ञानेश्वर नगर या भागातील जवळपास 300 पेक्षा अधिक घरांना पाणी पुरवठा होत आहे, याचा पाणी पुरवठा दाबवर परिणाम होत आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर नगरमधील राहिवाश्यांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही.
संत ज्ञानेश्वर नगरमधील पाईप लाईन ही सुरुवातील 5 इंचाची आहे तर नंतर तीन इंचाची आहे. मुख्य रस्त्या लगत असलेल्या घरांना व्यवस्थीत व चांगल्या दाबाने पाणी पुरवठा होतो व मधल्या भागातील व शेवटच्या घरांना पाणी पुरवठा होतच नाही. ज्याना चांगला पाणी पुरवठा मिळतो त्यांचे पाणी भरुन झाल्यानंतर त्यांनी पाणी बंद केल्यानंतर बाकीच्यांना पाणी मिळते तो पर्यंत खूप उशिर झालेला असतो आणि पाणी मिळतच नाही अशी आरडा ओरड येथील महिला नागरीक सतत करतात.
महिलांच्या मागणीला वाली कोण ?
महिलांनी या पूर्वी अनेक वेळा तोंडी मागणी करुनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होत, परंतु आता लोकप्रतिनधीचे राज्य आले असून ते तरी या समस्याकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विनोद मुळूक यांची तत्परता
उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी महिलांच्या समस्या समजून घेतल्या आणि यावर तत्काळ कारवाई करण्याचे संबंधीताना निर्देशही दिले आहेत.






