स्व.झुंबरलालजी खटोड सामाजीक प्रतिष्ठानच्यावतीने संगितमय कथाचे आयोजन- गौतम खटोड
बीड – बीड शहरातील खटोड प्रतिष्ठानच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून सामाजीक कार्या बरोबरच सर्वाधिक प्रमाणात धार्मिक क्षेत्रात कार्य केले जात आहे. मागील काही वर्षापासून किर्तन मोहत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जात आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून खटोड प्रतिष्ठानच्या वतीने 5 ते 11 मे 2026 दरम्यान संगितमय कथांचे आयोजन केले आहे. यात संत ज्ञानेश्वर महाराज, नवनाथ कथासार आणि अधिक मास महात्म्य या विषयांवर संगितमय कथांचे वाचन केले जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सव व अधिक मासाचे औचित्य साधून बीड शहरातील स्व.झुंबरलाल खटोड सामाजीक प्रतिष्ठान,बीडच्या वतीने संगितमय कथांचे आयोजन करण्यात आले.
स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानच्या वतीने बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे संगितमय कथांचे आयोजन केले आहे. यामध्ये दि.5 ते 11 मे 2026 ला सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथाचे वाचन कथाकार पंढरपूरच्या साध्वी अनुराधा दिदी ह्या करणार आहेत.
तर दि.5 ते 8 मे 2026ला दुपारी 4 ते 5 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत नवनाथ कथासाराचे वाचन श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र देऊळगावराज येथील ह.भ.प. वेदविभूषण श्री.उध्दोव महाराज पैठणकर करणार आहेत.
याच बरोबर दि.9 ते 11 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 3 ते 6 व 6.30 ते 9 या कालावधी अधिक मास महात्म्य या विषयावर अहिल्यानगर येथील ह.भ.प.गीतांजलीताई झेंडे या कथा सांगणार आहेत.
अश्या प्रकारे अधिक मास व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवा निमित्ताने बीड शहरात संगितमय कथांचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने गौतम खटोड यांनी केले आहे.






