ताज्या बातम्या

बीडकरांसाठी आकर्षक गंगा आवतरण देखावा

नवरंगने जपली पौराणिक कथांची परंपरा

बीड – बीड शहरातील जुन्या भागात असलेला सर्वांत जुने गणेश मंडळ म्हणजे नवरंग गणेश मंडळ होय. हे गणेश मंडळ या वर्षी आपले 75 वे वर्ष सादर करत असून गणेश मंडळाने आपली धार्मिक व पौराणिक देखावा सादर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.


75 वर्षापूर्वी अनेक तरुणांनी एकत्र येवून या नवरंग गणेश मंडळाची स्थापना केली आणि आजही हे गणेश मंडळ आपल्या परंपरेला जपत आले आहे.
मागील तीस एक वर्षापासून बीड शहरात हालते देखावे सादर करण्याची परंपरा सुरु झाली असून मधल्या काही कालखंडात ही परंपरा खंडीत झाली होती परंतु तरुणांनी एकत्र येवून ही परंपरा परत सुरु केली आहे.
पौराणिक कथा, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासीक घटनांवर देखावे सादर करण्याची या मंडळाची परंपरा आहे.
नवरंग गणेश मंडळाने मागील वर्षी दहिहंडीचा अप्रतिम देखावा सादर केला ज्याला बीडकरांनी भरभरुन प्रतिसाद व दादही दिली.
नवरंग गणेश मंडळाने या वर्षी भगीरथाने महादेवाची प्रार्थना करुन पृथ्वीवर गंगा आणली या पौराणिक व धार्मिक कथांवर आधारीत गंगा आवतरण हा देखावा सादर केला आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करुन ज्यात लाकूड, माती, कपडे यांचा समावेश आहे याचा वापर करुन हा देखावा सादर केला आहे. 75 वर्षापूर्वी मंडळाची स्थापना करणार्‍या तरुणापैकी असलेले दत्तात्रय नलवाडे यांनी मंडळाच्या कार्याचा पट उलघडला आणि सांगितले की, या नवीन तरुणांनीही मंडळाची परंपरा आमच्या सारखीच जपली आहे. मंडळाचे अध्यक्ष पवन लड्डा यांनी सांगितले की, मान्यवारांचे स्वागत सत्कार आम्ही वृक्ष देवून करणार आहोत ज्याने पर्यावरण वाचेल.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button