कला-संस्कृतीबीड

विघ्नर्हता – बीडमधील पहिला हायटेक डिजिटल गणपती मंडळ

बीडमधील तरुणांनी घडवली क्रांती – मंडळाचे स्वतःचे पेमेंट अ‍ॅप, वेबसाईट- पेपर लेस वर्गणी

बीड – तरुणांनी ठरवल तर काहीही शक्य होवू शकत हे बीडमधील विघ्नर्हता गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून करुन दाखवल आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाकडे एक पाऊल टाकत हायटेक गणेश मंडळाचे स्वप्न साकारत स्वतःच पेमेंट अ‍ॅप आणि वेबसाईट तयार केली आहे.


अरुंद गल्लीबोळ, वाकडे तिकडे वळणदार रस्ते यामुळे भव्य देखावा तर सोडा साधा ऐसपैस गणपती बसवणही शक्य नाही आशा स्थितीत गणेश उत्सव साजर करण्याची परंपरा विघ्नर्हता गणेश मंडळाने कायम ठेवली आहे.
मंडळामध्ये सर्व तरुण कार्यकर्ते सहभागी आहे. त्यांनी नव्याचा ध्यास घेतला आणि डिटिल हायटेकपणे गणपती उत्सव साजरा करण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नालाही त्यांनी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने आणि वेळेत पूर्ण केले.
मंडळाने यावर्षी हायटेक कार्यप्रणाली वापरली. वर्गणी गोळा करण्यासाठी सर्वच गणेश मंडळ पावती पुस्तक छापून वर्गणी गोळा करतात परंतु विघ्नर्हता गणेश मंडळातील तरुण शिकलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून आपल्या कॉम्प्युटर शिक्षणाचा वापर करुन पेपर लेस वर्गणी गोळ करण्यासाठी एक पेमेंट अ‍ॅप विकसीत केले. ऐवढेच नाही तर श्रेयस आवढाळ, गणेश जोशी, गौरव कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी या अगदी पंचवीसतील तरुणांनी गणेश मंडळाची एक वेबसाईट बनवली आणि त्यावर आतापर्यंतची गणेश मंडळाच्या उत्सवाची पूर्ण माहिती, फ ोटो टाकूण आपल्या उपक्रमांची माहिती जनतेला दिली आहे.
गणेश मंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी या सॉफटवेअर इंजिनिअरच्या नेतृत्वाखाली तरुणांनी हायटेक गणेश उत्सवाचे स्वप्न पाहिले आणि ते साकारले आहे.
गणेश उत्सवामध्ये जमा झालेल्या वर्गणीतून सामाजीक बांधलीकीचे कामे करायचे हे मंडळाचे कामही या तरुणांनी पुढे चालू ठेवले आहे. बीडमधील हा अनोखा उपक्रम आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button