मे महिन्यात बीड जिल्ह्यात पाणी संकाट ?

बीड – मागील वर्षी सर्वोत्तम पाऊस झाला असला तरी यावर्षी घश्याला कोरड पडणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
बीड शहरासह जिल्ह्यात परत एकदा पाणी टंचाईचे संकट घोंगवत असून पाणी साठाच्या स्तर कमी होत आहे आणि मोठ्या प्रकल्पां बरोबरच मध्यम आणि लघु प्रकल्पही पुढील काही दिवसात तळ गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड शहराची ताहान भागविणारा एकमेव मोठा प्रकल्प म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो तो म्हणजे माजलगाव धरण प्रकल्प. या प्रकल्पातही सध्याच्या स्थितीला फ क्त 48.91 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मे महिन्याची सुरुवात होणार असून त्या आधीच जिल्ह्यात परत एकदा पाणी संकट निर्माण झाल आहे.
बीड शहराला पाणी पुरवठा करणारा एकमेव मध्यम प्रकल्प असलेला बीडचे धरणानेही निम्म्यापेक्षा कमी पाणी पातळी गाठली असून जून पर्यंत हा साठा अजून कमी होईल. यामुळे प्रकल्प कोरडे ठक होण्याच्या मार्गावर आहेत.
पाणी हा नागरीकांच्या जीव्हाळ्याचा विषय असून पाण्या विना कोणतीही गोष्ट होवू शकत नाही. परंतु जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अश्याप्रकारे पाठी साठा कमी होत गेला तर पुढील पावसाळा सुरु होण्या आगोदरच जिल्ह्यावासीना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.
जिल्ह्यात एकूण 126 लघु पाटबंधारे प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांमध्येही 25.04 टक्के पाणी साठा शिल्लक आहेत.
जिल्ह्याची एकूण पाणी साठवण क्षमता पाहिली तर जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत बांधण्यात आलेल्या धरणांमध्ये माजलगाव व मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत आणि एकूण 16 मध्यम प्रकल्प आहे तर 126 लघु प्रकल्प आहेत. असे एकूण 143 धरण प्रकल्पांमध्ये मिळूण 716.021 दशलक्ष घनमीटर पाठी साठा आहे आणि सध्या 273.147 दलघमी पाठी साठा शिल्लक आहे. उपयुक्त पाणी साठ्याची ही टक्केवारी सरासरी 38.15 टक्के आहे.
मांजरा या नदीवर बांधलेला केज तालुक्यातील धनेगाव येथील धरण प्रकल्पात सध्या 44.45 टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 224.093 दलघमी असून सध्या उपयुक्त पाणी साठा 78.657 दलघमी आहे.
बीड शहराला बिंदूसरा प्रकल्प व्यतिरीक्त मुख्यत्वे करुन माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो आणि माजलगांव बॅक वॉटर ही 2009 मध्ये योजना राबविण्यात आली होती. त्याचा सध्या वापर करुन बीडकरांना पाणी पुरवठा होतो आहे. परंतु माजलगाव धरणातील पाणीसाठा झपाटयाने कमी होत आहे त्यामुळे बीड शहरावासीयां समोरही पाण्याचे संकट उभे राहिल आशी भिती निर्माण झाली आहे.







