महाराष्ट्र
मुख्यमंत्री फ डणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकिय सहाय्यता निधीच्या फ ाईलवर

मुंबई- महाराष्ट्र राज्याचे नुतन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फ डणवीस यांनी आपली पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फ ाईलवर करुन एका रुग्णाला जीवदान देण्याचे काम केले आहे.
पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुर्हाडे यांच्या बोन मॅरी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीसाठी अर्ज केला होता. देवेंद्र फ डणवीस यांनी गुरुवारी सांयकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीच्या आधी कुर्हाडे यांच्या वैद्यकिय सहाय्यता निधीच्या फ ाईलवर स्वाक्षरी करुन त्यांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचे सांगितले.