महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ क्रिकेट संघात सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकिय महाविद्यालयाच्या अन्सारीची निवड

बीड- अखिल भारतीय अंतर विद्यापीठातंर्गत होणार्या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघात बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी वैद्यकिय महाविद्यालयाचा खेळाडू अन्सारी आलीमुद्दीन याची निवड झाली आहे.
अखिल भारतीय अंतर विद्यापीठातंर्गत होणार्या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या राज्यस्तरीय संघाची निवड चाचणी ही अमरावतीच्या डॉ.पंजाबराव भाऊसाहेब देशमुख मेमोरीयल मेडिकल कॉलेज येथे आयोजीत करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी राज्यातील विविध वैद्यकिय महाविद्यालयातून खेळाडू आले होते. चाचणी दरम्यान निवडण्यात आलेल्या विद्यापीठीय संघात बीड शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी वैद्यकिय महाविद्यालयाचा खेळाडू अन्सारी नदीम इकबाल आलीमुद्दीन याची निवड झाली आहे.
अन्सारी आलीमुद्दीन याची निवड झाल्याबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महाविद्यालयाचे सल्लागार डॉ.अरुण भस्मे, प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल, उपप्राचार्य डॉ.गणेश पांगारकर व महाविद्यालयाचे क्रिडा विभाग प्रमुख डॉ.आतीक शेख व सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाने अन्सारीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.