योग्य व संतुलित आहार हे डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक – प्रदीप चौधरी

बीड प्रतिनिधी- हल्लीच्या पिझ्झा बर्गरच्या व धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच विशेष करून विद्यार्थी वर्गाने आपल्या योग्य व संतुलित आहाराकडे लक्ष द्यावे जेणे करून जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे डोळ्यांचे आजार टाळता येतील. मोबाईल व कॉम्प्युटरचा नियंत्रित वापर करणे, डोळ्यांना विश्रांती व पूरक व्यायाम अशा छोट्या छोट्या गोष्टींनी डोळ्यांचे आजार टाळता येऊ शकतात असे मत बीड जिल्हा धर्मादाय कार्यालयाचे उपायुक्त प्रदिप चौधरी यांनी केले.
शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथे जागतिक रेटिना दिवसा निमित्ताने आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मादाय कार्यालय, बीडचे उपायुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉ. शरद तेलप यांनी उपस्थित नागरिक, रुग्ण व आंतरवासीय विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आजार त्यांची कारणे, उपाययोजना, व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय यावर विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांनी जागतिक रेटिना दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्या नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान, धर्मादाय आयुक्त कार्यालय, बीड व सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित महात्मा गांधी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र विकार निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराची प्रस्तावना केली. अध्यक्षीय स्थानावरून महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. अरुण भस्मे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. चैतन्य कागदे, मुख्यमंत्री सहायता निधी समन्वयक यांनी शासकीय योजनेशी निगडित माहिती सर्व उपस्थित नागरिकांना दिली. सदर शिबिरात सुमारे 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 22 रुग्ण शस्त्रक्रिया चष्मासाठी व पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय, बीड येथील निरीक्षक ललित बोंडे, व. लिपिक श्री. कु. दि. कुंभार, क. लिपिक आसिफखान पठाण