साई सुदर्शन ः बॅटने केली धुवांधार डावांची कामगिरी

इंडियन प्रिमियर लिग (आयपीएल) मध्ये गुजरात टायटनचा धडाकेबाज फ लंदाज म्हणून सध्या जो चर्चेत राहिला आहे तो साई सुदर्शन यांने आपल्या बॅटने या लिग स्पर्धेत एक चत्मकार केला असून तो सध्या सर्वांचा चर्चेचा चेहरा झाला आहे.
आयपीएल स्पर्धेत अनेक जण वेगवेगळ्या कामगिरीमुळे चर्चेत आहेत परंतु यात गुजरात टायटन संघाचा धडाकेबाज फ लंदाज साई सुदर्शन आपल्या कामगिरीमुळे सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याने आता पर्यंत स्पर्धेतील सात सामन्यात मिळून 444 धावा केल्या असून त्याने आता पर्यंत 65,84,6,103,74,63 धावा केल्या. त्याने आता पर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 28 सामने खेळले असून यात 1 शतक आणि 8 अर्धशतके केली आहेत.
सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत सुदर्शन याने पंजाब किंग्स विरुध्दच्या पहिल्या सामन्यात 74, मुंबई इंडियंस विरुध्दच्या सामन्यात 63 आणि रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुध्द 49 धावा करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळविले आहे.
गुजरात टायटनचा धडाकेबाज फ लंदाज साई सुदर्शन यांने भारतीय संघात पदार्पण केले असून त्याने आता पर्यंत तीन एकदिवशीय आणि एक टि-20 सामना खेळला आहे. त्याने एकदिवशीय सामन्यात दोन अर्धशतक करत 63.5 च्या सरासरीने 127 धावा केल्या आहेत.
