युरोपला वगळून अमेरिकेची रुस बरोबर शांती चर्चा ?

युक्रेन-रुस युध्द आता चौथ्या वर्षात पदार्पण करेल परंतु या दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या अतिशय वेगवान घडामोडीमुळे आता शांती चर्चेची पहाट होईल असे वारंवार सांगितले जात असून सुध्दा एका बाजूला आनंद तर दुसर्या बाजूला चिंता आहे. कारण अमेरिकेने युरोपीयन देशाना विश्वासात न घेताच रुस बरोबर शांंतीतेचा डाव टाकला आहे यावरुन युरोप व अमेरिकेत दरी निर्माण झाली आहे व आरोप प्रत्यारोपही होत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 व 14 फे ब्रुवारीला अमेरिकेच्या दौर्यावर होते आणि ते अमेरिकेत दाखल होण्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रुसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली व युध्द थांबविण्यासाठी शांती चर्चेचा आग्रह धरला, यासाठी त्यांनी रुसला आमंत्रित केले. ट्रम्प यांची ही बातमी बाहेर आल्यानंतर सहाजीकच युरोप व युक्रेनलाही धक्का बसला, या दोघांनीही आरोप केला की आम्हांला विश्वासात न घेता ट्रम्प यांनी एकतफ ा हा निर्णय घोषीत केला आहे.

अमेरिकेची ही हालचाल एका बाजूला सुरु असतानाच जर्मनीतील म्युनिख येथे एक शांती बैठक झाली ज्यात अमेरिकेचे उपराष्ट्रपती बेंस यांनी युरोपीयन देशालाच चांगलच सुनावत सांगितले की युरोपला बाह्य शक्तीकडून नव्हे तर अंतर्गत धोका आहे. यावरुन युरोपीयन युनियन आणि युक्रेनही चिडलेले दिसून आले.
अमेरिकेने मात्र आपले प्रयत्न अजून जोराने सुरु केले असून रुसला शांती चर्चेसाठी आमंत्रित करत पुढील काही दिवसात सऊदी अरबमध्ये शांती चर्चेची बैठक आयोजीत करण्याची तयारी सुरु केली आहे.यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियोसह अमेरिकेचे विशेष दूत कीथ केलॉगही यात सामिल होतील.

युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्कींचा अमेरिकेवर आरोप- रुस-युक्रेन युध्द सुरु असतानाच शांतीसाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकार्याच्या धोरणाचे जगाने जरी स्वागत केले असले तरी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्कींनी आरोप केला की आमच्या संदर्भात शांतीत चर्चा असतानाच आम्हांलाच याची माहिती न देता किंवा विश्वासात न घेता अमेरिकेन हे परस्पर ठरविलेले आहे जे आम्हांला मान्य नाही.
फ्र ाँसमध्ये होणार युरोपीय देशांचा मेळावा – अमेरिकेने युरोपीयन देशाना बाजूला सारल्याची भावना या खंडातील देशात परसरली असून अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व युरोपची सुरक्षा करण्यासाठी फ्र ाँसने पुढाकार घेतला असून लवकरच सर्व युरोपीय राष्ट्रातील प्रमुख शासनकर्ते या बैठकीसाठी पॅरिसला येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नाटोत पसरली दुफ ळी – अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी परस्पर रुस बरोबर शांती चर्चा करण्याची तयारी सुरु केली असल्याचे समोर येताच नॉर्थ ट्रीट्री ऑर्गनायझेशन (नाटो) तील सहभागी सर्व युरोपीय देशांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी युरोपच्या सुरक्षेसाठी जरुरी पावले उचलणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. तसेच युरोपला बाजूला सारले गेल्याने अमेरिका व युरोपीयन देशात एक प्रकारची मोठी दरी निर्माण झाली आहे. यातूनच नाटो संघटनेच्या अस्तित्वावरही प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे आणि हीच कृती पुढे चालू राहिली तर नाटोतूनच अमेरिकेला बाहेर काढले जाईल असे संकेत मिळत आहेत.
युक्रेनला फ सविले गेल्याची भावना – युक्रेनला नाटो संघटनेच सदस्यत्व दिले जाईल असे आश्वान दिले गेले होते आणि यावरुनच रुस व युकेनमध्ये युध्द भडकले. मागील तीन वर्षाच्या कालावधीत पूर्व अमेरिकन राष्ट्रपती जो बाईडन यांनी युक्रेनला सर्वप्रकारची मदत दिली होती व हे युध्द चालू ठेवले होते परंतु ट्रम्प सत्तेवर आल्यापासून पारडे फि रले असून युक्रेनला त्यांनी शस्त्रपुरवठा व अर्थपुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे युक्रेन अडचणीत आला आहे व आपल्याला एक तर नाटोचा सदस्यही करुन घेतले गेले नाही आणि न भरुन येणारी हानी झाल्याने युक्रेन उध्दवस्त झाला आहे. यामुळे युक्रेनमध्ये आपल्याला फ सविल्याची भावना निर्माण झाली आहे.
