श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे विज्ञान दिन साजरा

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात रिबीन कट करून आणि प्रतिमा पूजनाने झाली. विज्ञान दिनाच्या निमित्ताने शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवले होते .यामध्ये सोलार सिस्टिम, वॉटर सायकल, ज्वालामुखी प्रोजेक्ट, सोर्स ऑफ वॉटर, बॉडी पार्ट्स नेम ,पार्टस ऑफ प्लांट, रेल्वे ट्रॅक फंक्शन पदार्थांच्या अवस्था ,प्रदूषणाचे प्रकार जल प्रदूषण ,हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा विविध प्रकारचे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सादर केले व त्याची माहिती सांगितली.
विज्ञान दिनाची माहिती आपल्या शाळेतील शिक्षिका श्रीमती शितल गोरे मॅडम यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी श्रावणी डोंगरे व स्वरांजली सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विज्ञान शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्ष श्री पारगावकर, सचिव शेख पाशा, उपमुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी मॅडम, सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.
