गुरुवारी गजकेसरी योगामुळे या राशींना होणार लाभ

गुरुवारी 13 फे ब्रुवारी रोजी सिंह राशीत चंद्र आणि वृषभ राशीत गुरु ग्रह राहणार असून हे दोघे एकमेकांच्या केंद्र भावात राहणार असल्याने याला गजकेसरी योग असे म्हणतात. या गजकेसरीमुळे वृषभ,कर्क, कन्या,कुंभ व मिन राशींच्या लोकांना लाभ होणार आहे.
मेष – नवीन कामांसाठी संधी, विनाकारण खर्च टाळावा
या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी नवीन योजनांवर काम करण्यांचा दिवस असून या कामांना पुढे नेण्यासाठी दुसर्या शहरातील लोकांशी संपर्क करणे योग ठरेल. आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीने यश मिळेल तर पैश्याच्या संदर्भात हा चांगला दिवस असेल परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे.
वृषभ – नवी संधी मिळतील
या राशींच्या लोकांना काम करण्याबाबत अनेक विचार मनात घोळतील या कारणामुळे आज या राशींच्या लोकांना योग्य आणि अयोग्य या बाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ घ्यावा लागेल व या राशीच्या लोकांनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेवू नये. पैसे कमविण्यासाठी हा दिवस चांगला आहे.
मिथून – विचारपूर्वक गुंतवणूक करा
अयोग्य काम करण्यासाठी या राशीच्या लोकांना आज लालच दिली जावू शकते परंतु या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत या चक्रव्ह्यूत अडकवू नये व आपल्या योग्य कामावर लक्ष केंद्रित करावे. या लोकांनी अंतरात्माचा आवाज ऐकावा. पैसे कमविण्यासाठी हा दिवस चांगला असून व्यवसाय वाढविण्यासाठी खर्च करणे लाभदायक ठरेल.

कर्क – थोडी सावधगिरी बाळगा
या राशीच्या लोकांनी स्वताःची स्तुती करणे आणि घमंडपासून वाचले पाहिजे परंतु दुसर्याला मदत केल्यास तुम्हांला याचा फ ायदा होईल. कामासाठी चांगला दिवस असून मनात असलेले काम पूर्ण होईल. पैसे कमविण्यासाठी हा दिवस चांगला आहे आणि अचानक धनलाभाचा योग आहे परंतु सावधगिरी बाळगा.
सिंह – करिअरमध्ये प्रगती होईल
या राशिच्या लोकांसाठी आजचा दिवस करीअरसाठी सर्वांत चांगला राहणार आहे आणि करीअरमध्ये या राशीच्या लोकांची प्रगती होईल. आर्थिकदृष्टया आजचा दिवस या लोकांसाठी चांगला राहिल आणि व्याजाच्या रुपात धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या – खर्चावर नियंत्रण ठेवा
या राशीच्या लोकांना कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहणार आहे. मन लावून काम करा यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूश राहतील. जमिन-संपतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचा आजचा दिवस ठरणार आहे. आर्थिकदृष्टया आजचा दिवस चांगला राहिल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजचे आहे.
तुळ – भविष्यासाठी बचत करा
या राशीचे लोक आत्मविश्वासाने सर्व कामे पूर्ण करु शकतील व कुटुंबातील लोकांबरोबरील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतील. आर्थिकदृष्टया आजचा दिवस चांगला राहणार असून नशिबाची साथही मिळेल. मुलांवर खर्च होवू शकतो आणि भविष्यासाठी बचत करावी.

वृश्चिक – विचारपूर्वक योजना करावी
स्वताःला सिध्द करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करतील आणि आज तुमचे लक्ष आर्थिक प्रकरणावर जास्त राहिल. पैसे कमविणे जमा करण्यावर लक्ष राहिल. भविष्यातील खर्चाला लक्षात घेवून गुंतवणूक करावी व विचारपूर्व योजना करावी.
धनु – नवीन संधीचा फ ायदा घ्या
या राशींच्या लोकांचा आजचा दिवस प्रॉपर्टीशी संबंधी वादाना सोडण्यावर लक्ष राहिल आणि सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल. आर्थिकदृष्टया आजचा दिवस चांगला असेल आणि धन लाभाचा योग आहे. नवी संधींचा फ ायदा घ्यावा.
मकर – सावधगिरीने गुंतवणूक करावी
या राशींच्या लोकांमध्ये आजच्या दिवशी कामा बाबत संभ्रम अवस्था निर्माण होईल परंतु मेहनत आणि योग्य निर्णयामुळे लवकरच या स्थितीतून बाहेर पडाल. आर्थिकदृष्टया चांगला दिवस आहे परंतु खर्च जास्त होवू शकतो. गुंतवणूकीतून लाभ होवू शकतो पण सावधगिरीने गुंतवणूक करावी.
कुंभ – मानसिकदृष्टया परेशान राहतील
या राशीचे लोक मानसिकदृष्टया परेशान राहतील आणि स्वताःला कमजोर असल्याचे जाणिव करतील. कामा बाबत आपल्यातील कलेचा वापर केल्यास ते फ ायद्याचे ठरेल. आर्थिकद़ृष्टया दिवस सामान्य आहे व गुंतवणूक फ ायदेशीर ठरेल.
मीन – अनेक इच्छा मनात निर्माण होतील
या राशींच्या लोकांच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतील आणि त्या पूर्ण करण्यातच आजचा दिवस जाईल. कोणाला उसने दिलेले पैसे अटकू शकतात यामुळे देवाण घेवाण करताना सावधगिरी बाळगावी. आर्थिकदृष्टया आजचा दिवस चांगला असेल परंतु खर्च होईल.
