अमेरिकेकडून कॅनाडा, मॅक्सिकोवर 25 टक्के तर चीनवर दहा टक्के आयात कर

अमेरिका – चीन व्यापार युध्दाचा भडका ?
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान कॅनाडा, मॅक्सिको आणि चीनमधून अमेरिकेत आयात होणार्या वस्तूंवर जास्तीचा आयात कर लागू करुत असे आश्वासन दिले होते आणि अमेरिका प्रथमचा नारा दिला होता, त्या कामाला त्यांनी सुरुवात केली असून 1 फे ब्रुवारीला त्यांनी कॅनाडा व मॅक्सिकोच्या वस्तूंवर 25 टक्के कर लागू केल्याचा आदेश प्रसिध्द केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तवर येताच आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यास सुरुवात केली असून त्यांनी 1 फे ब्रुवारी 2025 ला कॅनाडा व मॅक्सिको या दोनीही शेजारील राष्ट्रातून अमेरिकेत आयात होणार्या वस्तूंवर 25 टक्के आयात कर लागू केला आहे तर चीनच्या वस्तूंवर 10 टक्के अतिरीक्त शुल्क कर घेण्याचा आदेश प्रसिध्द केला आहे.
मॅक्सिकोतून होणारा ड्रग्स व्यापारामुळे अमेरिकन लोकांचे जीवनमान धोक्यात आले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते आणि हा ड्रग्सचा व्यापार मूळापासून उखडून टाकण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. तर कॅनाडा बरोबर जे संबंध ताणले गेले आहेत त्यामुळे ट्रम्प यांनी कॅनाडा अमेरिकेत विलन व्हावा अशी मागणी केली होती. त्यामुळे कॅनाडाला धडा शिकविण्यााठी त्यांनी हे पाऊल उचले असल्याचे बोलले जात आहे.

चीन बरोबर व्यापार युध्दास सुरुवात – चीन हा अमेरिकेच्या व्यापारक्षेत्रातील सर्वांत पहिल्या क्रमांकाचा शत्रू झाला असून चीनी स्वस्त वस्तूंमुळे अमेरिका व्यापारात मागे पडला आहे असे ट्रम्प यांना वाटत असल्याने चीनमधून आयात होणार्या वस्तूंवर आयात कर लावण्याची त्यांनी घोषणा केली होती त्यानुसार त्यांनी अतिरीक्त 10 टक्के आयात कर लागू करण्याची घोषणा केली आहे.
ट्रम्प यांच्या या पावलामुळे आता जगभर व्यापार युध्द पेटेल असे बोलले जात आहे. 10 टक्के अतिरीक्त शुक्ल चीनी वस्तूंवर लादल्यामुळे चीनी वस्तू अमेरिकेत महाग होतील आणि परिणाम चीनच्या वस्तू विक्रीत मंदी येईल यामुळे चीन व अमेरिकेत आता व्यापार युध्द भडकेल असे चित्र निर्माण झाले आहे.

