मराठी चित्रपट अभिनेता डॉ.महेशकुमार वनवे समाजरत्न सांस्कृतिक गौरव पुरस्काराने सन्मानीत

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत ख्याती मिळविणारे उच्चशिक्षित चित्रपट अभिनेते डॉ. महेशकुमार वनवे यांना आज दिनांक २७ जुलै २०२५ रविवार रोजी ठाणे येथे सांस्कृतिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठाणे येथे वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन व विचार मंथन मेळावा आयोजित करण्यात आला होता. समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना समाजरत्न सांस्कृतिक गौरव पुरस्कार २०२५ पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र चित्रपट अभिनेते डॉ. महेशकुमार वणवे यांनी आतापर्यंत केलेल्या समाजहिताच्या कार्यासाठी सांस्कृतिक गौरव पुरस्कार २०२५ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक २७ जुलै २०२५ रविवार रोजी ठाणे येथे पार पडला. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अमोल गिते, धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे आणि अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. महेशकुमार ज्ञानदेव वनवे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा देण्यात येत आहे.
चित्रपटसृष्टीत व्यस्त असूनही सामाजिक कार्यातही अग्रेसर
अभिनेते डॉ. महेश कुमार वनवे यांचे वामा, आणि ठिणगी हे दोन मराठी चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच इतर चित्रपटात व्यस्त असून सुद्धा सामाजिक कार्याकडे ही त्यांचे सतत लक्ष असते. बीड येथे जेव्हा त्यांचे दोन्ही मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून बेघर निवारागृहातील बेघरांना हे दोन्ही चित्रपट खास निमंत्रित करून दाखविले होते. यामुळे त्यांच्यात असलेल्या संवेदनशील मनाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही