राज्य बालनाट्य स्पर्धेत गंगापूर च्या ‘आम्ही नाटक करीत आहोत’ या बालनाट्याचा डंका; दिग्दर्शक रुपाली आल्हाट यांच्या टिमचे सर्वत्र हाेतेय कौतुक

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२४-२५ प्राथमिक फेरी ही तापडिया नाट्य मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.

दि. २० व २१ जानेवारी रोजी मोठ्या थाटात हा नाट्य सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी पहिल्यांदा गंगापूर मधुन एन्ट्री गेली असून ‘आम्ही नाटक करीत आहोत’ मध्ये मुलांचे सादरीकरण देखील खूप सुंदर झाले आहे.
यावेळी मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी सादर झालेले ‘आम्ही नाटक करीत आहोत’ हे नाटक सात्यार्जव बहुद्देशीय सेवाभावी संस्था, गंगापूर यांनी सादर केलेले होते. हे नाटक प्रेक्षकांना खूप भावले. अनेकांनी त्या संदर्भात छान प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आसिफ शेख अन्सारी यांचे लेखन असलेले ‘आम्ही नाटक करीत आहोत’ हे खरोखरच लक्षवेधी ठरले. या नाटकाचे दिग्दर्शन रुपाली रविंद्र आल्हाट यांनी केले. त्यांच्या कल्पकतेने या नाटकाला चार चांद लागले.

‘आम्ही नाटक करीत आहोत’ चे तांत्रिक कलावंत : नेपथ्य : विपूल भोले, वंश पानकडे, समर्थ शिंदे, प्रकाश योजना : संतोष गौतम, पार्श्वसंगीत : विशाल झिने, रंगभूषा : जयेश पदार, जॉय भांबाळ वेशभूषा : गितांजली जोशी, शुभ्रा हिरश्चंद्रे

‘आम्ही नाटक करीत आहोत’ चा पात्र परिचय :
बंटी : श्रेयस बर्डे, सोनू : मंथन बागूल, गुड्डू : श्लोक जोशी, दिदि : लावण्या पठारे, बबली : आराध्या पठाडे, आवाज : वीराज माघाडे

हे तर आमच्या टीमचे यश आहे
मी सातत्याने नव्या विषयांची हाताळणी करते. जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा नाटकातील प्रत्येक पात्रांना जीवंत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. िवषयाची मांडणी अतिशय गांभिर्याने केली आहे. आणि मला वाटते त्यामुळेच ते प्रेक्षकांना अपील झाले. ते आमच्या टीमचे कौतुक करत आहेत हेच आमचे यश आहे असून मी लेखक असिफ शेख अन्सारी सरांची खूप आभारी आहे की त्यांनी आम्हला हे नाटक सादर करण्यासाठी परवानगी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाट्य कला शिकत असताना किंवा यात काम करत असतांना किती वेगवेगळ्या विषयांना प्रश्नांना तोंड द्यावे लागते हे लेखकांनी अचूक पणे मांडले आहे.
-रुपाली रविंद्र आल्हाट, नाट्य दिग्दर्शीका

