केंद्रिय मंत्री निर्मला सीतारामन व विजय रुपाणी महाराष्ट्रासाठी पर्यवेक्षक

नवी दिल्ली- महाराष्ट्रात झालेल्या निवडणूकीनंतर भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे आणि भाजपचा गटनेता निवडण्यासाठी पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाने केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजप विधीमंडळ सदस्यांची 4 डिसेंबरला बैठक होणार आहे.
महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि भाजप राज्यात 132 जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु आज पर्यंत बारा दिवसानंतरही भाजप गटनेत्याची निवड झालेली नाही. सरकारही स्थापनेचा दावा करण्यात आला नाही.
भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने 2 डिसेंबरला केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केली आहे. हे दोन्ही नेते 3 डिसेंबरला सायंकाळी मुंबईत पोहचतील आणि 4 डिसेंबरला भाजप नवनिर्वाचीत सदस्यांची बैठक होईल व त्यात गटनेत्याची निवड होईल. देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होईल हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपच्या गटनेतेपदाची निवड झाल्यानंतर भाजप व महायुतीतील मित्र पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा करतील आणि 5 डिसेंबरला शपथ होईल असे सांगण्यात येते.