डॉ.व्ही.नारायणन इस्त्रोचे नवीन अध्यक्ष

बेंगळूर – डॉ.व्ही.नारायणन हे भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून 14 जानेवारीला पदभार संभाळणार असून माळवते अध्यक्ष डॉ.एस.सोमनाथ हे सेवानिवृत्त होत आहेत.
देशातील आग्रणी संस्थापैकी एक असलेली इस्त्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉ.व्ही नारायणन यांची निवड करण्यात आली असून ते सध्या इस्त्रोतील लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम या शाखेचे संचालक आहेत. त्यांनी या संचालक पदाच्या कार्यकाळात इस्त्रोच्या विविध मोहिमांसाठी 183 लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम व कंट्रोल पॉवर प्लँटस विकसीत केलेले आहे.
याच बरोबर त्यांनी भारताच्या महत्वकांक्षी जीएसव्ही -मार्क-3 साठीच्या सी-25 या क्रायोजनिक इंजिनच्या विकासाचे प्रकल्प संचालक म्हणून काम केले आहे याच बरोबर चंद्रयान-2 आणि 3, सूर्याच्या अभ्यासासाठी पाठविलेले आदित्य-1 या मोहिमांसाठी मोठे योगदान दिले आहेत.
इस्त्रोचे सेवानिवृत्त होत असलेले मावळते अध्यक्ष डॉ.एस. सोमनाथन यांच्या कार्यकाळात भारताने अनेक अंतराळात अनेक विक्रम स्थापित केले आहेत. यात चंद्रयान -3 चे यशस्वी अवतरण, स्पेसडॉक्स प्रोग्रॉम, अनेक विदेशी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण राहिले आहेत.

