आरोग्य

योगसाधनेत हस्तमुद्रांचे महत्व

योेग साधनेमध्ये आष्टांग योगाच्या व्यतिरीक्त मुद्राला विशेष महत्व आहे. मुद्रा ह्या आसनाचे विकसीत रुप आहे. आसनामध्ये इंद्रियांना प्रधानता असते. आणि प्राणाला गौणता असते. मुद्रामध्यें इंद्रियांना गौणता आणि प्राणाला प्रधानात असते. योगशास्त्रात असे म्हटले आहे की नास्ति मुद्रासमं किचिंत् सिध्दिदं क्षितिमण्डले. अर्थात या पृथ्वीवर मुद्रा समान दुसरे कोणतेही कार्य नाही. आसनाने अन्नमय कोशाच्या पातळीवर म्हणजेच शारिरीक पातळीवर दृढता प्राप्त होते, तर मुद्रांच्या योक्षे प्राणमय व मनोमय कोशाच्या पातळीवर स्थिरता प्राप्त होते. योगसाधनेचा उद्देशच हा आहे की, शरिरामध्ये जास्तीत जास्त प्राण ऊर्जा निर्माण करणे, साठविणे व योग्यठिकाणी योग्य कार्याकडे वळविणे अशा असल्यामुळे ऊर्जा स्तोत्रांना शरिरांतर्गत रोखू ठेवण्याच्या क्रियेला किंवा मुद्रा महत्व आहे.

मुद्रा हा योगभ्यासातील छोटा पण महत्वाचा भाग आहे. मुद्रा हे हठयोगाचे वैशिष्ट आहे. हठयोगाच्या प्राचीन ग्रंथामध्ये हठयोग प्रदिपीका, घेरंडसंहिता, शिवसंहिता, सिध्दसिध्दांत, गोरक्षसंहिता यामध्ये मुद्रांचे वर्णन सापडते. भगवान शिवाने आपली पत्नी/शिष्या पार्वतीमाताला प्रथम मुद्रांचे ज्ञान दिले किंवा मुद्रांचा अभ्यास करुन साधक सर्व सिध्दी प्राप्त करु शकतो. चित्ताला प्रगट करणार्‍या विशेष भावाला मुद्रा म्हणतात. मुद्रा हे सर्वश्रेष्ठ सिध्दीदायक साधन म्हटले आहे. उच्च श्रेणीच्या भारतीय नृत्यामध्ये उदा. भारतनाट्यम्, उडिया यामध्ये हस्तमुद्रेला विशेष प्राधान्य आहे. ज्यामुळे आतील भावांनाचे प्रगटीकरण होते. मुद्रांचा अभ्यास साधकाला शरिरांतर्गत प्राणशक्तीच्या तरंगा प्रती जागृत बनवतो. काही मुद्रांच्या अभ्यासाद्वारे अनैछिक शारिरीक प्रक्रियांवर नियंत्रण प्राप्त केले जावू शकते. मुद्रांचा अभ्यास बंध व आसन व प्राणायाम केला जातो. या अभ्यासात साधकाचा बाह्य जगाशी संबंध हळूहळू तुटतो. इंद्रिये अंतमुखी होवून प्रत्याहार हा साधला जातो आणि या प्रत्याहाराच्या अभ्यासासाठी मुद्रांचा विशेषतः अध्यात्मिक उपयोग होतो. शारिरीक व मानसिक लाभ तर मुद्रामुळे होतातच.
धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ सिध्द करण्यासाठी शरिर व मन स्वस्थ्य असणे नितांत आवश्यक आहे. यासंदर्भात हठयोगीयांना मोक्षाचे साधन म्हणून आरोग्य प्राप्ती हेतू हठयोग साधनेला विकसीत केले आहे. हठयोग साधनेचा अभ्यास आणि अंतताः राजयोग पद प्राप्त करण्याच्या उद्देशाने केला जातो. राजयोगाच्या उच्चतम शिखरावर पोहचण्याची इच्छा असणार्‍या अभ्यासाकासाठी हठविद्या एखाद्या शिडी प्रमाणे काम करते. हठयोगाच्या तिसर्‍या उपदेशात मुद्रांचे वर्णन दिले आहे. ज्या प्रमाणे राजाच्या शिवाय एखादे राज्य, चंद्राशिवाय रात्र आणि राजचिन्हा शिवाय असलेली मुद्रा जशी निरर्थक आहे. त्याच प्रमाणे राजयोगा शिवाय आसन, कुंभक व मुद्रांचा अभ्यासह निरर्थक आहे. मुद्रा विषयक वर्णन प्राचीन वैदकग्रंथ, उपनिषेधे, पुराणे, आयुर्वेदिक ग्रंथ, तांत्रिक ग्रंथ इत्यादीमध्ये कमी अधिक प्रमाणात आडळते.
मुद्रा या शब्दाचे सामान्य अर्थ चिन्हांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मुहोरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तसम वस्तू असता. हठयोगशास्त्रात हठयोगाशी संबंधीत विशिष्ठ शारिरीक आकृति बंध या अर्थाने मुद्रा हा शब्द आलेला आहे. शारिरीक आकृती बंध म्हणजे, शरिराच्या एखाद्या भागास दाबून अथवा बांधून ठेवणे.
मुद्राची व्याख्या ः मुद्रा हा शब्द संस्कृतमधील मुद या धातूपासून बनलेला आहे. मुद म्हणजे प्रसन्नता तर मुद्राचा दुसरा अर्थ धन असा होतो. ज्याप्रमाणे एखाद्यास धन प्राप्त झाल्यानंतर तो आनंदी होतो त्याप्रमाणे योगी किंवा साधक मुद्राच्या अभ्यासाने प्रसंन्न आनंदी होतो.
व्याख्या ड्ढ शरिराची अशी स्थिती ज्यातून आनंद मिळतो ती स्थिती म्हणजे मुद्रा हे तंत्र साधनेचे अंग आहे.

मुद्राचे प्रकार ड्ढ सुविधेसाठी मुद्राचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

प्राणोत्थान व कुंडली जागृतीसाठी करावा लागणार्‍या मुद्रा
योगशास्त्रात असंख्य मुद्रा सांगितलेल्या आहेतश अंदाजे 400 पेक्षा मुद्रांचे वर्णन शास्त्रामध्ये सापडते. परंतु प्रत्यक्ष अभ्यासासाठी ह्या सर्व मुद्रा अभ्यासता येणे शक्यनाही. हठयोग ग्रंथामध्ये एकूण 10 मुद्रांचे वर्णन आहे, घेरंड संहितेमध्ये एकूण 25 मुद्राचे वर्णन आहे. शिवसंहितेमध्ये एकूण 10 मुद्रांचे वर्णन आहे. अशा ह्या असंख्य मुद्रांपैकी विशेष मुद्रांचा अभ्यास करुन साधक साधना करत करत मोक्ष प्राप्ती करुन घेवू शकतो.
पहिला प्रकार – पंचभूताच्या तत्वांचे नियमन करणार्‍या मुद्रा
ज्या प्रमाणे पिंडी ते ब्रम्हांडी असा विचार केला तर शरिर पूर्ण पंचमहाभूताने बनलेले आहे. अग्नि,वायू, आकाश, पृथ्वी व जल. हे पंचमहाभूत शरिराच्या हातावरील बोटावर विसावलेेली आहेत.
अग्नि ड्ढ अंगठा
वायू – तर्जनी
आकाश – मध्यमा
पृथ्वी – अनमिका
जल – करंगळी

योगशास्त्रामध्ये ही बोटी एकमेकांना स्पर्श करुन जी मुद्रा तयार होते त्या मुद्राच्या सहाय्याने साधक साधना करीत राहिला तर साधकाला सिध्दी सहज प्राप्त होता.
प्राणोत्थान कुंडली जागृतीसाठी मुद्रा ड्ढ
या मुद्रांच्या सहाय्याने प्राणांचे नियमन करुन योगी किंवा साधक कुंडली जागृती करु शकतो व कैवल्या पर्यंत किंवा मुक्तीपर्यंत जावू शकतो.
मुद्रांचे लाभ – असंख्य मुद्रापैकी काही ठराविक मुद्रांचा सातत्यांने, शास्त्रोक्तपध्दतीने, श्रध्दा ठेवून अभ्यास केला तर खालील लाभ होतो.

नाडीची शुध्दी होते. 2. चंद्रनाडी व सूर्यनाडीची समानता होते 3. प्राण व अपानाचे संतुलन होते 4. साधक जन्म व मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. 5. वार्ध्यक्य येत नाही. 6. आष्टसिध्दीची प्राप्ती होते 7. रोगप्रतिकार शक्ती वाढते. 8. रोगाचे निराकारण होते. 9. मन अंतरमुख होते. ज्यामुळे प्रत्याहार साधला जातो. 10. शरिर अंतर्गत प्राणवायूच्या तरंगाकृती जागृता येते. 11. शरिरातील अनैच्छिक क्रीयावर नियंत्रण साधता येते.
ज्ञानमुद्रा :- यालाच ध्यानमुद्राही म्हणतात तर्जनी व अंगठ्याची टोके जुळणे आणि इतर तीन बोटे सरळ रेषेत ठेवणे म्हणजे ज्ञानमुद्रा होय इतर बोटे सरळ ठेवण्यासाठी ताण देऊ नये ही मुद्रा केव्हाही व कोणताही अवस्थेत करता येते या मुद्द्यामुळे मन शांत होते ध्यानातही मुद्रा ध्यान लागण्यासाठी सहाय्यक होते या मुद्रामुळे बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते उन्माद वायू व विक्षिप्तपणा चिडचिडपणा मनाचा चंचलपणा भय क्रोध आळस या दोषावर विजय मिळवता येतो ही मुद्रा दररोज सलग 45 मिनिटे केल्यास वरील सर्व विकारात तीन महिन्यात फरक दिसतो सतत करणे न जमल्यास दहा ते पंधरा मिनिटे असे चार ते पाच वेळा करता येते झोपताना ज्ञानमुद्रा केली तर झोप लागण्यास मदत होते.

वायु मुद्रा:- तर्जिनचे टॉप अंगठ्याच्या मुळाशी लावायचे अंगठा तर्जनीवर ठेवायचा व इतर बोटे सहज ठेवायची म्हणजे वायू मुद्रा होते ही मुद्रा केल्याने वायु तत्का कमी झाल्याने वायूमुळे होणारे स्पॉडीलायटिस कंबर दुखी गुडघेदुखी सायटिका यासारख्या विकारावर फायदा होतो मुरलेल्या दुखण्यासाठीही मुद्दा जास्त दिवस करावी लागते त्रास कमी झाला की मुद्रा करणे थांबावे पंख्याखाली झोपल्यास अंग जड होते रात्री झोपताना वायू मुद्रा करून झोपल्यास सकाळी अंग जड होत नाही पायात गोळा आला तर वायू मुद्रा केल्यास त्रास कमी होतो शरीरातील लाईव्ह मध्ये शिरांत ज्ञानतंतू मध्ये शिर्डीला वायू वेदना निर्माण करतो त्या वेदना वायू मुद्रामुळे कमी होता
आकाश मुद्रा:- अंगठा व मधले बोट यांची टोके जुळणे व इतर बोटे सहज सरळ ठेवणे म्हणजे आकाश मुद्रा होते आवश्यकतेनुसार 15 ते 45 मिनिटे करावी आकाशमुद्रा केल्याने हाडे मजबूत व्हायला मदत होते हृदयाच्या व्याधींना त्याचा फायदा होतो कानाचे विकार कमी होतात
शून्य मुद्रा :- मधल्या बोटाची टोक अंगठ्याच्या मुळाशी लावून अंगठा त्या बोटावर ठेवायचा म्हणजे शून्य मुद्रा होते ही देखील कानाच्या विकारात अत्यंत उपयोगी आहे बहिरेपणासाठी रोज 50 ते 60 मिनिटे केल्यास निश्चित फायदा होतो
पृथ्वी मुद्रा :- अनामिका व अंगठा यांची अग्रे जुळून इतर बोटे सहज सरळ ठेवणे म्हणजे पृथ्वी मुद्रा होते या मुद्रांनी पृथ्वीतत्व वाढते त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होते रोड व्यक्तींनी केल्यास वजन वाढते शरीराला बळकटी आल्यामुळे तेज वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते शौचास घाई लागल्यास व ताबडतोब जाणे शक्य नसल्यास ही मुद्रा केल्याने फायदा होतो
सूर्यमुद्रा :- अनामिकेचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावावे व अंगठा अनामिकेवर ठेवायचा म्हणजे सूर्यमुद्रा होते.

ही मुद्रा केल्याने शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे जाडी वजन कमी व्हायला मदत होते मानसिक ताण असल्यास कमी होतो.
वरूण मुद्रा :- करंगळी व अंगठा यांची टोके जुळून इतर बोटे सहज सरळ ठेवायची म्हणजे वरूण मुद्रा ते ही अवश्यतेनुसार किती वेळा केली तरी चालते ह्याने शरीरातील जलतत्त्व वाढते व त्वचेचा रूक्षफणा कमी होतो गॅस्ट्रो सारख्या रोगात ही मुद्रा उपयुक्त पित्त कमी होण्यास उपयोगी तसेच घशाची कोरड कमी होते.
रूक्ष मुद्रा :- करंगळीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावायचे व अंगठा करंगळीवर ठेवायचा आणि इतर बोटे सहज सरळ ठेवायची म्हणजे रूक्ष मुद्रा होते या मुद्रेने शरीरातील जलतत्त्व कमी होत असल्याने आवश्यक तेवढा वेळच मुद्रा करावी जास्त वेळ करू नये जलोदर छातीत होणारे पाणी यासारख्या त्रासावर परिणामकारक लघवीची घाई लागल्यास या मुद्रने काही वेळ आवरता येते घाम जास्त येणार्‍यांना ही मुद्रा फायदेशीर आहे.
अपान मुद्रा :- हाताचे मधले बोट व अनामिका बोट यांचे अंगश्याच्या टोकाला जुळणे व इतर बोटे सहज सरळ ठेवणे म्हणजे अपान मुद्रा होय ही मुद्रा कितीही वेळा केले तरी चालते या मुद्रेमुळे शरीर निर्मळ होते विजातीय द्रव्य व मळ शरीराबाहेर टाकले जातो शरीर शुद्धतेबरोबर मनाची शुद्धी होते लघवी अडण्याच्या विकारावर ही मुद्रा उपयोगी आहे ही मुद्रा अत्यंत फायदेशीर आहे घाम न येणाचा त्रास असता घाम येऊन फायदा होतो छातीत घशात कफ अडकला असता या मुद्रामुळे कफ खाली जात असल्याची जाणीव होते व बरे होते.

प्राण मुद्रा :- करंगळी व अनामिका यांची टोके अगश्याच्या टोकाला जोडणे व इतर बोटे सहज सरळ ठेवणे म्हणजे प्राणमुद्रा होय ही मुद्रा कितीही वेळा केली तरी चालते अतिशय महत्त्वाची ही मुद्दा आहे आजारपणात विशेषतः लाभदायक होते या मुद्रेने प्राणीशक्तीचे वर्धन होते व शक्ती वाढल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते मनुष्य उत्साही बनतो बरेच अंतर चालायचे असेल किंवा चढ चढायचा असेल तेव्हा ही मुद्रा केल्यास दमछाप होत नाही दृष्टी सुधारते व नंबर कमी होतो जेवण झाल्यावर केल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
शंख मुद्रा :- उजव्या मुठीत डाव्या हाताचा अंगठा बंद करून डाव्या हाताची तर्जनी व उजव्या हाताचा अंगठा यांची टोके जुळणे व डाव्या हाताची बाकीचे बोटे उजव्या हाताच्या मुठीवर ठेवणे म्हणजे शंख मुद्रा होय ही मुद्रा हात बदलून करता येते किती. ही वेळा केली तरी चालते या मुद्रेने आवाजातील दोष कमी होतात बेंबीशी संबंधित असणार्‍या नाड्यांवर स्वास्थ्यवर्धक परिणाम होतो पचनशक्ती सुधारते भूक वाढते.
लिंग्ड मुद्रा :- दोन्ही हाताची बोटे एकमेकात अडकून एक अंगठा उजवा किंवा डावा पैकी एक सरळ ताठ ठेवणे म्हणजे लिंग्ड मुद्रा होते ही मुद्रा केल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन थंडी कमी होते कफ कमी होतो जुनी सर्दी किंवा थंडीचा त्रास असणार नाही मुद्रा फारच उपयोगी आहे.
वरील हस्त मुद्रा केल्यास शरीरातील अनेक व्याधी दूर होतात व स्वस्थ्य स्वास्थ्य लाभू शकतात. ह्या मुद्र आपय आयुष्यभर करु शकतात आणि हस्तमुद्रांमुळे अनेक व्याधीवर मात करतात येते हे या मुद्रांचे वैशिष्टय मानले जाते.

लेखक
डॉ.सी.ए.गायकवाड
गायकवाड हॉस्पिटल, बीड.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button