बुधवारी शेअर बाजारामध्ये निफ्टी,सेन्सेक्स आणि बँक निफ्टी मध्ये थोडीशी तेजी

उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर अमेरीकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सोमवार आणि मंगळवारी शेअर बाजारामध्ये चढ-उतार दिसून आला परंतु बुधवारी सकाळी घसरणीनंतर दुपारी शेअर बाजार थोडासा वधारलेला दिसून आला
बुधवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच शेअरच्या किंमतीमध्ये घसरण दिसून आली परंतु दुपारनंतर शेअर बाजार वधरलेला दिसून आला राष्ट्रीय निर्देशांक अर्थात निफ्टी 0.33 टक्क्याने वाढवून तो 24274. 90 रुपयांवर पोहोचला यामध्ये असलेल्या ५० शेअरपैकी 26 शेअर मध्ये तेजी दिसून आली तर 24 शेअर मध्ये घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार अर्थात बीएससी सेन्सेक्स 0.29 टक्क्यांनी वाढवून तो ८०२३४.०८ वर पोहोचला मुंबई शहर बाजारातील 30 शेअर पैकी 18 शेअरमध्ये तेजी दिसून आली तर बारा शेअर मध्ये घसरण दिसून आली आहे.
बँक निफ्टी मध्ये सुद्धा थोडीशी सुधारणा होऊन तो 0.21 टक्क्याने वाढवून 52 हजार 301.80 वर पोहोचला आहे बँक निफ्टी मध्ये एच डी एफ सी आणि ॲक्सिस बँक वगळता इतर दहा शेर मध्ये मात्र घसरण दिसून आली आहे आता शेअर बाजार गुरुवार सकाळी सव्वानऊ वाजता सुरू होईल तर आगामी काळात बाजार कोणत्या चालीने जातो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे त्यानुसार गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतलेली दिसून येत आहे.



