पं. ह्रषिकेश महाले व स्वरश्री यांची नवी गजल साजन मोरे… लाँच

पुणे प्रतिनिधी – साजन मोरे.. या गजल चा लॉन्च 11 जुन 2025 रोजी लोणावळा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. सुप्रसिद्ध गायिका व गीतकार स्वरश्री याचे अल्फाज, पं.ह्रषिकेश महालेच संगीत आणि याच दोघांनी गायलेली गजल साजन मोरे.. च अनावरण चंद्रकांत जोशी, गायक व आयोजक राजेश मेहता, सौ. उमा मेहता अशा खास मान्यवरांच्या हस्ते लाँच झाली.
गजलची गायकी व संगीत, शब्द उपस्थित रसिकांनी ठेका धरून पसंत केली. आयोजक राजेश मेहता यांनी असं प्रथमच लोणावळा येथे होत असल्याचे सांगितलं तसच सध्या नवीन गजल ऐकायला मिळण दुर्लभ असून पंडितजीनी दिलेलं संगीत हे त्या भावनेला वाट करून देत असही म्हंटल. संगीत अभ्यासक चंद्रकांत जोशी यांनी स्वरश्री यांच्या अल्फाजा बद्दल कौतुक केलं. या प्रसंगी पंडितजींचा मास्टरक्लास 2 च आयोजन ही करण्यात आलं होत.

लोणावळातील गायक गायीकांनी masterclass – 2 ला उदंड प्रतिसाद दिला. जागा कमी पडली बसायला रसिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात रसिकांची गर्दी झाली होती..
नंतर स्वरश्री यांनी त्यांच्याच लिहिलेल्या साजन मोरे.. या गजल विषयी अनेक पैलू गीतकारच्या भूमिकेतून उलगडून दाखवले. पं.ह्रषिकेश महाले व स्वरश्री या दोघांनी ही गजल LIVE स्वरूपात रसिकांना ऐकवली व प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळविली.

गजलच्या गाढा अभ्यास असलेले पं.ह्रषिकेश महाले नी गजल गायकांनी कशी अभ्यासावी व पेश करावी हे मास्टरक्लास मधून शिकवलं. या प्रसंगी कथक नृत्यागना अनन्या कुलकर्णी ही पण उपस्थित होती. विशेष साहाय्य कल्पेश मोघे यांनी केले. चाहत्यांनीही कार्यक्रमाला उर्त्स्फ त प्रतिसाद दिला.