श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

दिनांक 27 फेब्रुवारी 2025 कवी साहित्यिक कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील छोट्या गटातील आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी कविता , अभंग ,श्लोक, सुविचार ,म्हणी ,मराठा दिनानिमित्त कविता, चारोळी ,ओवी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक पात्री नाटक वऱ्हाड निघाले लंडनला हे नाटक आपल्या शाळेतील विद्यार्थिनी आरोही जोशी इन हिने उत्कृष्ट सादरीकरण केले.
तसेच शाळेतील श्रीमती स्नेहा पारगावकर मॅडम यांनी उत्कृष्ट कविता सादरीकरण केले तसेच शाळेचे अध्यक्ष पारगावकर यांनी मुलांना मराठी भाषेचे महत्त्व आणि कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी सखोल माहिती दिली .
शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व आणि मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी दिनाच्या निमित्ताने मराठी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी अनन्या खेत्रे आणि स्वानंदी पवळ या दोघींनी केले तसेच आभार प्रदर्शन इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी आराध्या आझडे नी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील अध्यक्ष पारगावकर, सचिव शेख पाशा , श्रीमती स्नेहा पारगावकर मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता सूर्यवंशी मॅडम, मराठी विषय शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
