उद्योगरत्न डॉ. कौतिक दांडगे यांना ‘गझल सोबती’पुरस्कार

मुंबई : प्रणाली म्हात्रे
सर्वसामान्य जनतेला कष्टकऱ्यांना स्वस्तात घरगुती सामान व इतर साहित्य मिळावे म्हणून ‘महाराष्ट्र बाजार पेठे’ ची स्थापना करून एका सामान्य कुटूंबातून आलेल्या डॉ. कौतिक दांगडे यांनी गरूडझेप घेत कष्टाने नाव कमावले. उद्योगरत्न म्हणून आज त्यांचा सर्वत्र सन्मान होत आहे. आज मुंबईत होत असलेल्या ‘गझल मंथन’ साहित्य संस्थेचे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन दि. १९ जानेवारी रविवार रोजी नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार असून या कार्यक्रमात ‘गझल सोबती’पुरस्कार उद्योजक डॉ. कौतिक दांडगे यांना देण्यात येणार आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख…..!
खऱ्या अर्थाने कष्टकरी…
एका शेतकरी वारकरी कुटूंबात संभाजीनगर, बाळापूर येथे १८ जून १९७५ मध्ये जन्म घेतलेल्या डॉ. कौतिक दांडगे यांचे शालेय शिक्षण गावीच झाले. नंतर अकरावी, बारावी संभाजीनगर येथे झाले लहानपणापासून कष्ट करण्याची जिद्द असलेल्या दांडगे यानी आपल्या वडिलांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय करून कुटूंब चालवण्याची कला आत्मसात करून सुरुवातीला बेकरीतून पाव आणून विकले, नंतर असेच छोटे मोठे काम करत कॉलेज करत हॉटेल मध्ये काम करून मालकाचा विश्वास संपादन केला.
गरूड भरारी घेतली
पुढे मॅनेजर पदावर रुजू होऊन त्यांनी मोठी गरूडझेप घेतली. आपल्या कुशल कार्यामुळे त्यांच्या हाताखाली १५ ते २० कामगार सांभाळत होते. उद्योग व्यवसाय करण्याची मिळालेली जिद्द उराशी बाळगून मुंबई नगरीत आपलं नशीब आजमवण्यासाठी आल्यानंतर सुरुवातीला नोकरी केली. नंतर त्याच कंपनीचे सी.ई.ओ पदी विराजमान झाल्यानंतर मार्केटिंग करताना आलेला अनुभव त्यातून स्वतःबरोबर गोरगरिबांना स्वस्तात घरगुती सामान उपलब्ध करून देण्याचा केलेला संकल्प साक्षात उत्तरवण्यासाठी २०१७ मध्ये ‘महाराष्ट्र बाजार पेठे’ची स्थापना दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी केली.

महिलांसाठी विविध योजना
‘महाराष्ट्र बाजार पेठे’ची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला डॉ दांडगे यानी हा व्यवसाय महिलांना समर्पित केला होता त्यानुसार महिलांना एकत्रित करत हळूहळू व्यवसाय वाढवत पुढे सुपर मार्केट च्या धरतीवर सुरुवातीला १०० महिला पुढे हजार त्यानंतर हजारोच्या ५० हजार महिला या महाराष्ट्र बाजार पेठेशी जोडल्या गेल्या आहेत. या बाजार पेठेत आलेल्या महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रक्षाबंधन, भाऊबीज, जागतिक महिला दिन, त्याचबरोबर त्यांना कुटूंबापासून वेगळे होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी नृत्य, प्रश्नमंजुषा, महिलेसाठी विशेष पिकनिक सारखे कार्यक्रम भरपूर बक्षिसांची लयलूट करण्यात येत असल्याकारणामुळे महिलांचा सहभाग वाढतच आहे. जून २०१७ मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र बाजार पेठेचा हा व्यवसाय मोठा होत गेला असून आता दशकपूर्तीकडे त्याची वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून समाजाला आपण काही तरी देणं लागतो, या उदेशाने आपण इतरांचे पुरस्कार स्वीकारतो असेच आपणही दुसऱ्याऱ्यांना दिले पाहिजेत म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असते.

प्रत्येक जिल्ह्यात असेल सुपरमार्केट
उद्योगरत्न डॉ. कौतिक दांङगे याना या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असले तरी अलीकडेच त्यांना अनेक संस्थांनी गौरवले आहे. आजचा हा गौरव सोहळा नक्कीच त्यांच्या यशाचे प्रतिक आहे. अनेक संस्था, समस्त बाजार पेठेसोबत जोडलेल्या महिलांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले होते डॉ दांडगे यांचे हे ध्येय खूप मोठे आहे पुढील दोन वर्षात मुंबईत ५ सुपर मार्केट सुरू करण्याचा संकल्प आहे. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात अशी सुपर मार्केट सुरू करून गोर गरीब जनतेला अगदी कमी दरात आपल्या घरचे सर्व सामान उपलब्ध करून घ्यायचे आहे त्यांच्या या स्वप्नाला बळ मिळावे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करून उद्योगरत्न डॉ कौतिक दांडगे यांच्या कार्याची व्याप्ती आणखीनच वाढेल अशा शुभेच्छा देऊन त्यांना या निमित्ताने उदंड आयुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो ही प्रार्थना.
–प्रणाली म्हात्रे, मुंबई
——————————————————–
