एकही गुण न मिळविता पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफि तून बाहेर

रावळपिंडी – गुरुवारी बांगलादेशा विरुध्दचा गट साखळीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तान व बांगलादेशही या स्पर्धेतून बाहेर पडले असून त्यांना एकही सामना जिंकता आला नाही.
सध्या पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफि स्पर्धेचा एकमेव यजमान असून भारत वगळता इतर देशाचे संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. भारताचे सर्व सामने हे दुबई येथे खेळले जात आहे.
या स्पर्धेत पाकिस्तानला मात्र अपयशाशिवाय काहीही मिळाल नाही. गट साखळी सामन्यातील न्यूझीलँड आणि त्यानंतर भारताकडून सपाटून मार खावा लागला. तर शेवटचा गटसाखळी सामना गुरुवारी पाकिस्तान बांगलादेशा विरुध्द खेळणार होता परंतु रावळपिंडीत मुसळधार पाऊस झाल्याने शेवटचा सामनाही रद्द करावा लागला त्यामुळे पाकिस्तानचे स्वप्न धुळीला मिळाले. पाकिस्तान या स्पर्धेत एकही सामना जिंकू शकला नाही आणि त्यांना बांगलादेशा विरुध्द सामना रद्द झाल्याने एकच गुण मिळाला आहे. पाकिस्तान या स्पर्धेतून अपनास्पदपणे बाहेर पडला आहे.
पाकिस्तानच्या या अपयशावर पाकिस्तानमधील राजकिय वातावरणही तापल असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफि स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तान व बांगलादेशातील सामना रद्द झाल्यानंतर गट ए मधील गुण तालिकेत न्यूझीलँड दोन सामने खेळत दोनीही जिंकून त्यांचे चार गुण झाले आहेत. तर भारतही दोन सामने खेळला असूनप दोनीही जिंकून चार गुणासह दुसर्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान तीन सामने खेळला असून यातील दोन सामने हरला आहे तर एक रद्द झाल्याने एक गुणासह तिसर्या क्रमांकावर आहे. बांगलादेश तीन सामने खेळला असून यातील दोन सामन्यात पराभूत झाला तर तिसरा सामना रद्द झाल्याने एक गुणासह चौथ्या स्थानावर आहे.
यजमानच स्पर्धे बाहेर – बांगलादेशा बरोबरील रावळपिंडीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानची उरलीसुरली शक्यताही मावळी असून एकही सामना न जिंकता पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 29 वर्षानंतर पाकिस्तानला स्पर्धा आयोजनाच यजमानपद मिळाल होत.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह – मंगळवारी बांगलादेश व न्यूझीलँडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात एक मोठी चूक झाली आणि एक दहशतवादी समर्थक चक्क मैदानात घुसला होता त्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. भारताने सुरुवातीपासूनच सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करुन पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळले जात आहे.