राज्यात थंडीने धरला जोर, रात्रीच्या तापनात घट, दिवसा बोचरी थंडी

बीड – नोव्हेंबरच्या मध्यापासून हिवाळ्याची चाहूल लागू लागली आणि पाहता पाहता थंडीने जोर पकडला आहे. रात्रीचे तापमान आता बऱ्यापैकी कमी जाणू लागले आहे त्यामुळे थंडी आता रात्री वाजू लागली आहे तर दिवसाचे तापमान सूर्यप्रकाशामुळे जरी कमी जाणवत असले तरी थंडी जाणवतच आहे
आता पुढील महिना आणि त्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत थंडी चांगलीच जोर पकडेल असे दिसत आहे थंडीमुळे त्रास जाणवत आहे तर त्यात तरुणाई मात्र थंडीची चांगल्या प्रकारे मोजमजा घेत आहेत काही ठिकाणी आता हुरडा पार्टी ही रंगू लागली आहे तर रात्री तापमानामुळे बाहेर जाणे लोकं टाळत आहेत पण हिवाळा हा आता चांगलाच जाणू लागला आहे आणि पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडेल असे बोलले जाते त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे जाणकार लोक सांगत आहे जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
तर निराधार लोक आश्रय शोधत आहेत आणि शासनाने सुद्धा या लोकांसाठी निवारा बांधकाम केलेले दिसून येत आहे शहरांमध्ये अशा प्रकारचे निवारा आता लोकांसाठी आशयाचे ठिकाण बनले आहे राज्यात पुढील काही दिवसात थंडी अजून जोर पकडेल. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी गरमी देणारे कपडे हे बाजारामध्ये विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसत आहे.