ग्लोबल प्री प्राइमरी आणि शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

बीड – प्रियदर्शनी महिला बहुउद्देशीय व ग्रामीण सेवाभावी संस्था संचलित ग्लोबल प्री प्राइमरी आणि शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल,पांगरी रोड, बीड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे संचालक बी.बी.जाधव (सनदी लेखापाल), तसेच याप्रसंगी संस्थेच्या वतीने बळीराज गवते बळीराम, मगर तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल जोशी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विविध सांस्कृतिक, क्रीडा, कला या क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी भारतीय राज्यघटना, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती या स्वरूपावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्यांनी आपल्या भाषणातून भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य प्रतिपादित केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण संस्थेचे संचालक सीबीपी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्हीं भावी भारताचे आदर्श नागरिक,तसेच भारताला महासत्ता बनवण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा असेल असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी निधी खरझाडे आणि कुमारी आदिती बोर्डे यांनी केले. या कार्यक्रमासाठी आदेश आणि मैदान व्यवस्था कुमार संकल्प जाधव आणि कुमार कार्तिक कदम यांच्याद्वारे पूर्ण करण्यात आली.

ग्लोबल प्राइमरी आणि शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलच वातावरण देशभक्तीपर विचारधारा आणि गीताने सर्वांना मंत्रमुग्ध करत होत. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक मंचाचे सदस्य सौ.जयश्री नाईक, सौ.राजश्री गवते, सचिन अग्रवाल तसेच सौ.शितल कांबळे यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शिक्षण संस्थेच्या वतीने बी.बी.जाधव (सनदी लेखापाल), प्रा. मदनराव जाधव, सौ. वैशालीताई जाधव, प्राचार्य अनिल जोशी यांनी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
