कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्यास भारत-चीन सहमत

नवी दिल्ली – मानसरोवर यात्रेसह, सीमा व्यापार आणि सीमावाद सोडविण्यास प्राधान्य देण्याचे ठरवत भारत-चीनने आज मैत्रीचा हात परत एकदा पुढे करत अनेक वर्षाची कटुता संपविल्याचे संकेत दिले आहे..
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या चीनच्या दौर्यावर असून त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली सध्या हे दोघेही आप आपल्या देशाचे विशेष प्रतिनधी म्हणून चर्चा करत आहेत. या दोघांच्या बैठकीत सीमावाद सोडविण्यासाठी मार्ग शोधत राहणे, तिबेटला लागून असलेल्या सीमेवरुन पर्यटनाला चालना देणे, दोन्ही देशातील जलवादाला सोडविणे अर्थात नदीपाणी वाटपावर एकमेकांशी माहितीची देवाण घेवाण करणे, नथुला खंडीतून सीमा व्यापाराला चालना देणे आणि सर्वांत महत्वाचे कैलास मानसरोवर यात्रेला परत एकदा सुरु करणे आहे. या मुद्दांवर झालेल्या सहमतीने दोन्ही देशातील तणाव थोडा निव्वळेल असे संकेत आहेत.
चीन मागे का हटला –
सन 2020 मध्ये झालेल्या गलवाण खिंडीतील घटनेत वीस भारतीय जवान शहिद झाल्यानंतर दोनीही देशात तणाव वाढत राहिला आणि त्याचा परिणाम अनेक क्षेत्रात झाला. आता मात्र भूराजकिय स्थिती बदलत असून यूक्रेन-रशिया युध्दाला तीन वर्ष होत आहेत आणि त्याच बरेाबर अमेरिकेत बायडनच सरकार जावून डोनाल्ड ट्रम्पच सरकार येत आहे आणि ट्रम्पच्या मागील सरकारच्या काळात चीन-अमेरिकेचे संबंध अतिशय टोकाला गेले होते व त्याचा फ टका चीनला बसला होता व व्यापारात तोटा सहन करावा लागला होता.