जालना येथे श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका फेरीचे आगमन

जालना – श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाची फेरी शुक्रवारी जालना येथे पोहोचली आहे व येथे पादुकांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. समर्थ स्वामी रामदास यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सज्जनगड येथून स्वामींच्या पादुकांची दर्शन फेरी निघाली असून ती जालना येथे पोहोचली आहे. आज शुक्रवारी जालना येथे या पादुकांचे आगमन झाले आहे

जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या व फुलांची उधळण केली गेली. या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी महिला व भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. स्वामींच्या या पादुका फेरी बरोबर समर्थ रामदास यांच्या वंशातील प.पू.भूषण महारुद्र स्वामी हे सुद्धा सहभागी आहेत.
जालना शहरात ठीक ठिकाणी पादुकांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भक्त गणांनी जय जय रघुवीर समर्थांची घोषणा दिली. जालना शहरांमध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचा मुक्काम हा 18 ते 23 जानेवारी पर्यंत राहणार आहे यावेळी विविध भागातून प्रचार व दर्शन फेरी काढण्यात येणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.

