भारताच्या जीडीपीमध्ये घसरणीचा सरकारचा अंदाज

नवी दिल्ली – आगामी आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये भारताचा सकल विकास उत्पाद (जीडीपी) मध्ये घसरण होवून तो 6.4 टक्क्यावर राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज केंद्रिय सांख्यिकी मंत्रालयाने वर्तविला असून तो मागील वर्षाच्या 8.2 टक्क्याच्या स्तरापेक्षा खूप कमी आहे.
भारत सरकारच्या केंद्रिय सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2025-2026 साठीचा जीडीपी दराची घोषणा केली असून या वर्षी वार्षीक दर हा 6.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तो 8.2 टक्के राहिल. सरकारच्या या अंदाजा व्यतिरीक्त नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषीत केलेल्या जीडीपीच्या आंकडेवारीत सांगण्यात आले की आर्थिक वर्ष 2025-2026 मधील पहिल्या तिमाहीत 6.9 टक्के आणि दुसर्या तिमाहीत 7.3 टक्के राहिल. तिसर्या तिमाहीत 6.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 7.2 टक्के राहिल.
केंद्रिय सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले की आर्थिक वर्ष 2024-25 चा जीडीपीचा दर 9.7 टक्के राहण्याची शक्यता असून तो मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या 9.6 टक्क्याच्या तुलनेत थोडा जास्त आहे.
कोणत्याही देशाची आर्थिकस्थिती मोजण्याचे एकमेव साधन म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (जीडीपी) हे असून हे दर तीन महिन्याला मोजले जाते. भारताचे आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला सुरु होते आणि 31 मार्चला संपते. त्यामुळे आपल्याकडे आर्थिक मोजमाप हे पहिली तिमाही एप्रिल, मे व जूनची, दुसरी तिमाही जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर, तिसरी तिमाही ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर आणि चौथी तिमाही जानेवारी, फे ब्रुवारी आणि मार्च अशी आहे.