…. धाड धाड कोसळला

मुंबई – मागील काही महिन्यांपासून शेअर बाजार सतत कोसळत असून कधी तरी त्यात आशेचा किरण दिसतो परंतु इतर वेळी शेअर बाजार कोसळलेला दिसून येतो आणि सोमवारी तर तो असा आपटला की, अनेक गुंतवणुकदार चिंतेत बुडालेले दिसून आले आहे आणि याच कारण आता नव्याने चीनमधून आलेला नवीन विषाणू आहे.
मागील वर्षी अर्थात 2024 च्या दिवाळी आधीपासून शेअर बाजार आपटत राहिला असून तो कधी तरी वधरत राहिला परंतु इतर वेळी तो घसरलेल्या स्थितीत आहे. वेगवेगळे कारण सांगत असले तरी भारतीय शेअर बाजार मागील चार पाच महिन्यात कधीही चांगल्या स्थितीत राहिला नाही.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फे डच्या व्याजदारातील व्याजदर संभाव्यताला लक्षात घेता डिसेंबरमध्ये सलग आठ दिवस भारतीय शेअर बाजार अस्थिरतेमध्ये राहिला तर परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेतल्याने सतत महिनाभर शेअर बाजार अस्थिरतेमध्ये राहिला आहे.
आता तर चीनमधून आलेल्या नवीन व्हायरसच कारण सांगत बाजार सोमवारी धाड धाड कोसळला आणि गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहे.
सोमवारी शेअर बाजार उघडला तोचमुळी घसरणीसह आणि त्यानंतर तो दिवसभर काही चढलाच नाही. राष्ट्रीय सूचकांक अर्थात निफटी हा जो घसरला तो बाजर बंद झाल्यानंतर 389.70 अंश अर्थात 1.62 टक्क्याने घसरुन तो 23,616.05 वर बंद झाला आहे. या निफटीमधील एकूण 50 कंपन्यांपैकी फ क्त सहा कंपन्यांचे शेअर तेजीत राहिले तर उर्वरीत 44 शेअरमध्ये घसरण राहिली. ज्या सहा शेअरमध्ये तेजी राहिली त्यात अपोलो हॉस्पीटल 1.94 टक्के, टाटा कंज्युमर प्रोडोक्ट 0.79 टक्के, टायटन 0.72 टक्के, एचसीएलटेक 0.10 टक्के, डॉ रेड्डी लॅयब्रोटरी 0.10 टक्के, इफ ोसेस लि. 0.01 टक्का नफयात राहिलेले शेअर होते.
तर मुंबई स्टॉक एक्सेंज 1258.12 अंश अर्थात 1.59 टक्क्याने घसरुन 77,964.99 वर आला आहे. या सूचकांकातील एकूण तीस कंपन्यांपैकी तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली आहे आणि यात टायटन 0.60 टक्के, एचसीएलटेक 0.26 टक्के आणि सन फ ार्मा 0.01 टक्क्याने वधरलेले दिसून आले तर बाकीचे 27 शेअरमध्ये घसरण दिसून दिली.
बँक निफटीमध्ये 2.09 टक्क्यांची घसरण होवून तो 49,922 पोहचला. यातील सर्वाच्या सर्व 12 शेअरमध्ये घसरण राहिलेली दिसून आली आहे.
बाजार विश्लेषकांच असच मत आहे की आगामी काळातही बाजार अस्थिर राहणार आहे कारण अमेरिकेत होणारे सत्तांतरण हे त्यामागच कारण आहे आणि याच बरोबर रुस-यूक्रेन युध्दाच भवितव्य, इस्त्रायलय -मध्य आशिया संघर्ष, पाकिस्तान-अफ गाण संघर्षातील घडामोडीवर हे अवलंबून असेल.
