शेअर बाजार वधरला

नवी दिल्ली – सोमवारी शेअर बाजार आपटल्यानंतर मंगळवारी मात्र तो सावरला असून दिवसभरात तो चढता राहिला अ्राणि निफटी, बँक निफटी व सेंसक्स तेजीत राहिलेला दिसून आला.
शेअर बाजाराने सोमवारच्या पडझडीनंतर मंगळवारी सुरुवातीपासूनच चांगली चाल करत गुंतवणूकदारांना दिलासा देण्याच काम केले आहे. बाजार सुुरु होताच आज तेजी राहिली असून राष्ट्रीय संवेदी सुचकांक (निफटी) दिवसभराच्या व्यवहारानंतर 91.85 अंश अर्थात 0.39 टक्क्याच्या चढाईसह 23,707.90 रुपयांवर बंद झाला आहे. या निफटीतील 50 शेअरपैकी 33 शेअरमध्ये तेजी राहिली तर 17 शेअरमध्ये घसरण राहिल्याचे दिसून आले.
मुंबई स्टॉक्स एक्सचेंजमधील सेंसेक्स हा बाजार बंद झाला तेव्हा 234.12 अंश अर्थात 0.30 टक्क्यांच्या चढाईसह 78,199.11 रुपयांवर पोहचला आहे. 30 शेअरवर आधारीत या सेंसेक्समधील 20 शेअरमध्ये तेजी राहिली तर 10 शेअरमध्ये घसरण राहिली आहे.
बँक निफटी 280.15 अंशासह 0.56 टक्क्याने वाढून 50,202.15 रुपयांवर पोहचली असून यातील 12 शेअरपैकी 9 शेअरमध्ये तेजी राहिली तर 3 शेअरमध्ये घसरण राहिली आहे.
