आयपीएल ः पहिल्याच सामन्यात आरसीबीचा विजय

कोलकता – इंडियन प्रिमियर लिग (आयपीएल) च्या उदघाटन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगोलरने कोलकता नाइट रायडर्सला सात गडी राखून पराभूत करुन आपल्या विजयी अभियानाची सुरुवात केली आहे.
कोलकता येथील मैदानावर आयपीएल स्पर्धेची सुरुवात 22 मार्चला सुरुवात झाली असून पहिला सामना रॉयल चॅलेजर्स बेंगलोर (आसीबी) आणि कोलकता नाइट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला गेला. प्रथम फ लंदाजी करत केकेआर संघाने 8 गडी गमवून 174 धावा केल्या.
प्रथम फ लंदाजी करण्यासाठी उतरलेल्या केकेआर संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला असून सलामीचा फ लंदाज क्विंटन डी कॉक बाद झाला. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर आलेल्या संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने धडाकेबाज फ लंदाजी करत संघाला संभाळले व त्यांने 31 चेंडूत 56 धावा केल्या. तर सुनील नरेनने 26 चेंडूत 44 धावा केल्या. याच बरोबर रहाणे व सुनील नरेन या दोघांनी मिळून शतकीय भागेदारी केली. यानंतर मात्र केकेआरचा संघ संभाळू शकला नाही आणि त्यांनी आठ गडी गमवून 174 धावा केल्या. संघाने 15 षटकात 145 धावा केल्या तर शेवटच्या पाच षटकात 29 धावा केल्या.

आरसीबीकडून गोलंदाज हेजलवुडने 4 षटकात 22 धावा देवून चार गडी बाद केले. फि रकी गोलंदाज 3 गडी बाद केले. कुणालने कर्णधार अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंहला बाद केले.
विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य घेवून फ लंदाजीसाठी उत्तरलेल्या आरसीबीने सॉल्ट व विराट कोहलीने केलेल्या जोरदार फ लंदाजीच्या जोरावर विजय मिळविला. या दोघांच्या फ लंदाजीने पहिल्या सहा षटकातच संघाने 80 धावा केल्या. तर कर्णधार पाटीदार व लियम लिविंगस्टनने 16.2 षटकामध्ये विजय मिळविला. कर्णधार रजत पाटीदारने तुफ ानी फ लंदाजी करत 16 चेंडूत 212.50 च्या स्ट्रईक रेटने 5 चौकार व एक षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. कर्णधार म्हणून पाटीदारचा हा पहिलाच सामना होता.


