अखेर कॅनाडाच्या पंतप्रधान ट्रुडोचा राजीनामा

ओटावा – भारतावर एकामागोमाग एक आरोप करत वाद निर्माण केल्यानंतर स्वतःच्या देशातच स्वतःच्या व विरोधी पक्षांच्या चक्रव्ह्यूवामध्ये अडकलेले कॅनाडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्याच बरोबर आपल्या पक्षाचे नेतेपदही सोडले आहे.
भारता बरोबर कॅनाडाचे संबंध मागील दोन वर्षापासून खूपच तणावाचे राहिले असून 2023 मध्ये कॅनाडाचा नागरीक खलिस्तानी हरदिप निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केल्यापासून भारत -कॅनाडामध्ये वादाची थिणगी पडली, त्यावेळेपासून दोन्ही देशातील संबंध तणावाचे राहिले आहेत.
जस्टिन ट्र्रूडो यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॅनाडातील सत्ताधारीपक्ष लिबरल पक्षाच्या नेतेपदी कोणाची निवड होते व कोण पंतप्रधान बनेल याकडे सर्वांच लक्ष लागले असून यात क्रिस्टिया फ्र ीलँड, मार्क कार्नी, डोमिनिक लेब्लांक, मेलानी जोली,फ्राँस्वा फि लिप शैम्पेन, भारतवंशी अनीता आनंद आणि जॉर्ज चहल आघाडीवर आहेत. यात उपपंतप्रधान व अर्थमंत्री राहिलेल्या क्रिस्टिया फ्रि लँड सर्वांत आघाडीवर आहेत.
भारत-कॅनाडाचे संबंध तणावपूर्ण
कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 2023 मध्ये खलिस्तानी समर्थक हरदिप निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच ताणले गेले होते आणि त्याच अमेरिकेमध्ये होत असलेल्या सत्तांतराच्या दरम्यान नवनिर्वाचीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रप यांनीही जस्टिन ट्र्रूडोला आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे त्यावेळेपासून ट्रूडोवरही जागतिक दबाव निर्माण झाला होता आणि त्याचाच परिणाम त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.


