दसर्याच्या शुभमुहूर्तावर मेघ दाटले.. मराठी भावगीत रसिकांच्या भेटीस

पुणे – घन भरले.. आणि साजन मोरे.. यांच्या प्रचंड यशा नंतर 2 ऑक्टोबर 2025 या दिवशी दसर्याच्या शुभ मुहूर्तावर खास रसिकांच्या आग्रहस्तव नवीन भावगीत मेघ दाटले… येतंय. पं. ह्रषिकेश महाले यांच सदाबहार संगीत असलेलं आणि स्वरश्री यांचे शब्द व आवाज असलेलं मेघ दाटले.. हे भावगीत लवकरच रसिकांच्या सेवेत येत आहे.
आज पर्यंत 675 च्या वर संगीत रचना केलेले संगीतकार पं. ह्रषिकेश महाले यांनी हे थोडं शास्त्रीय रागावर आधारित गाणं कंपोज केलं असून. त्याची संगीत रचना त्यांनी स्वतः केले आहे. नुकताच पंडितजींना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 मिळाला.
गीतकार व गायिका स्वरश्री यांनी मेघ दाटले.. विषयी बोलताना सांगितलं की.. प्रथम त्यांना छोटीशी चाल सुचली व मग त्या चालीवर शब्द सुचले व लिहिले. सध्या रसिकांनी मागणी केल्या प्रमाणे घन भरले.. या यशस्वी गाण्यानंतर मेघ दाटले.. हे गीत लिहिलं आहे.
या गीतात सरगम व संतूर यांची छोटीशी जुगलबंदी व सुरुवातीला असलेला आलाप हे वैशिष्टय म्हणता येईल. तसच गाण्याचा ताल व लय – संगीत नृत्य करण्यास प्रेरणा देत.
KCA PHOENIX studio या लेबल तर्फे हे गाणं सर्वत्र उपलब्ध असेल. असं पं. ह्रषिकेश महाले यांनी सांगितलं..
