ताज्या बातम्या

राज्यात वाढली हुडहुडी

बीड – उत्तर भारतात विशेषतः जम्मू व काश्मिर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पडत असलेल्या बर्फ मुळे व डोंगरी राज्यातील वाढलेल्या थंडीचा मारा हा दक्षिण भारतातील राज्यांना बसत असून महाराष्ट्रात परत एकदा थंडीने जोर धरलेला आहे आणि रात्रीचे तापमान घसरले आहे तर दुपारच्या वेळी बोचरी थंडी अंगाला लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


पश्चिम चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलकासा पाऊस तसेच हिमालयालगतच्या भागांमध्ये बर्फवृष्टी होते. त्यामुळे तेथे थंडीचा जोर कमी जास्त होत आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील मंडला येथे सर्वात कमी ५ अंश सेल्सियसची नोंद झाली. दरम्यान, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यामुळे सकाळी थंडी तर दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.
राज्यातील धुळे, अहिल्यानगगर, निफाड, जळगाव, पुणे, नागपूर, गोंदिया येथे किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते. तर अनेक ठिकाणी धुक्यासह दव पडले होते.

शनिवारी दिवसभरात कमाल तापमानामध्ये वाढ झाली होती. मुंबईच्या सांता्क्रूझ भागात कमाल तापमानात 35 अंशांची नोंद झाली. तर पुण्यातही काही भागांमध्ये 33 अंशांपर्यंत कमाल तापमान गेलं होतं.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button