सूर्य व चंद्राच्या समसप्तक योगामुळे आज या राशींना होणार लाभ

सोमवारी दि.13 जानेवारीला सूर्य व चंद्र यांची होत असलेल्या समसप्तक योगामुळे आणि पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचा वाढलेल्या प्रभावामुळे मेष, कर्क, कन्या, तुळ आणि मकर या पाच राशींना मोठा लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे.
मेष – या राशीचे व्यक्ती हे आपल्या कामाला पुढे नेण्यासाठी नवनवीन पध्दतीना शोधतील आणि कोणताही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विचार करावा. आपल्या मनातील योजना बाबत इतर व्यक्ती बरोबर जास्त विचार विर्मश करु नये. या राशींच्या व्यक्तींसाठी पैसे कमविण्यासाठी हा काळ उत्तम असून ते नवनविन पर्यायांना शोधून काढतील आणि आपल्या कामाला पुढे नेण्यासाठी धोरणही आखतील. कोणत्याही गोष्टी बद्दल सखोल विचार करणे ही त्यांची विशेषता राहिल. आपल्या योजनाना गुप्त ठेवणेच त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल.
वृषभ – या राशीचे लोक सोमवारी आपली प्रतिमा दाखविण्यासाठी कठोर मेहनत करतील. या व्यक्तींना आजच्या दिवशी खूप काम असेल परंतु या कामाचे फ ळही मिळेल. या राशीनी घाईगडबडीने पैश्यांची देवाण घेवाण करणे टाळावे. या राशींच्या व्यक्तींना आजच्या दिवशी आश्या व्यक्तींच्या भेटी होतील जे पुढे जावून लाभदायक ठरु शकतील. आपल्या कर्तबगारीला जगा समोर आणण्याची सुवर्ण संधी मिळेल आणि याचा परिणामही तुमच्याच बाजूने असेल.
मिथून – या राशीचे लोक आजच्या दिवशी लहान लहान गोष्टींवरुनही परेशान होवू शकतात. यामुळे आपल्याच सहकार्या बरोबर खटके उडू शकतात. कठिण परिस्थितीना समजदारीने हातळणे हेच चांगले असेल आणि धैर्य आणि विनम्रताने काम करणे गरजेचे असेल. पैसे गुंतवणे हे फ ायदेशीर ठरणार असून यातून धनात वाढ होईल.
कर्क – या राशींच्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला असून त्यांचे काम आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होतील, ते आपल्या व्यक्तीमत्वाला फु लविण्यासाठी आणि स्वतः काम करण्यावर लक्ष देतील. पैश्याच्या बाबतीत आजचा दिवस या राशींच्या लोकांसाठी मजबूत स्थिती असेल. दिवस मात्र सामान्य गतीने जाईल आणि कामे हे कोणत्याही अडथळ्या विना होतील.
सिंह – या राशींच्या लोकांनी आजच्या दिवशी आपल्या व्यवहारामध्ये लवचिकता आणने गरजेचे असून अहंकारामुळे नुकसान होवू शकते. जागा बदलण्याचे योग असून दिर्घकाळानंतर लक्ष्याला गाठण्याचा मार्ग स्पष्ट दिसेल. पैश्याची तंगी येवू शकते परंतु मेहनतीने पैसे मिळू शकतात.
कन्या – या राशीतील तांत्रिक विद्याप्राप्त व्यक्तींना मोठे यश प्राप्त होवू शकते आणि या लोकांनी आपल्या योजना गुप्त ठेवून काम केल्यास चांगले होईल. चांगल्या कामाची प्रशंवसा होईल. पैश्याची मिळकत कमी असली तरी तंगई जाणावणार नाही. आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल.

तुळा – या राशीतील लोक जे आपल्या कौटुंबिक व्यवसायातच काम करत असतील त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहिल. नवीन कामाला सुरुवात होऊ शकते परंतु यासाठी बोलण्यात सावधगिरी बाळगावी, लोक तुम्हांला साथ देतील. जमिन, संपत्ती संबंधातील निर्णय फ ायदेशीर राहतील. नवीन उद्योगासाठी हा काळ उत्तम राहिल.
वृश्चिक – या राशींच्या लोकांनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करु नये आणि त्यांच्यासाठी कामकाजात चढ-उतार राहिल एखाद्या मोठया व्यक्तीमुळे काम सहज होईल. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. आरोग्या संबंधीची समस्या उद्भवू शकते

धनू – या राशीतील नोकदार व्यक्तींची प्रतिमा अधिकारी वर्गा समोर चांगली राहिल. मागील घटना परत घडू शकतात. अनावश्यक कामात पैसा आणि वेळ वाया घालू नका. उत्पादन क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु समजदारीने काम केल्यास यातून वाचू शकाल.
मकर – या राशीच्या लोकांना भागेदारीत व्यापार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या प्रति शिस्तबध्दता ही प्रगतीसाठी अनुकूल ठरेल परंतु घरच्या व्यक्तीं बरोबर मतभेद होवू शकतात. कामात तुमचा निर्णय मान्य असेल. पैसा मिळेल परंतु यासाठी नियमितता असायला हवी, आर्थिक लाभाचे योग आहे.
ेकुंभ – या राशीच्या लोकांना नवीन विचार हे कामाला सहजपणे बनवतील लहानशी चूक देखील मोठा वाद निर्माण करेल त्यामुळे लक्षपूर्व काम करावे, शूत्र पराजीत होईल. कर्ज घेण्यासाठी चांगला काळ आहे. जोखीम असलेल्या कामात पैसा बुडू शकतो यासाठी सावगिरी बाळगा.
मीन – या राशींच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहिल. मनोरंजनामुळे तणाव दूर होईल. कमिशन असलेल्या कामातून लाभ मिळेल. नोकदार लोकांचा दबदबा राहिल परंतु पैश्याच्या बाबतीत काळ सामान्य राहिल हा काळ आनंद, मौज, मस्तीचा आहे. कार्यक्षेत्रात प्रभाव कायम राहिल.