ऐतिहासीक आझाद मैदानावर होणार शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा

मुंबई- महाराष्ट्रात देवेंद्र फ डणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार असून शपथविधी सोहळा यावेळी आझाद मैदानावर होणार आहे आणि यात देवेंद्र फ डणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या बरोबर एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फ डणवीस हे राज्याचे नविन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि हा शपथविधीचा सोहळा मुंंबईतील ऐतिहासीक आझाद मैदानावर होणार आहे. 1995 ला ज्यावेळी शिवसेना-भाजपचे प्रथम सरकार स्थापन झाले होते, त्यावेळीही शिवर्तथावर शपथविधी सोहळा आयोजीत केला गेला होता आणि त्यानंतर ही दुसरी वेळ आहे ज्यावेळी मोठ्या मैदानावर शपथविधी सोहळा आयोजीत केला जात आहे.
आझाद मैदानाचे जुने नाव हे ग्वालीया टँक असून याच ठिकाणाहून 1942 ला महात्मा गांधीनी इंग्रजांच्या विरोधात चले जावोची घोषणा केली होती व देशभरात चले जावोचे आंदोलनही येथूनच सुरु झाले होते. पुढे या मैदानाचे नाव बदलून आझाद मैदान करण्यात आले आहे.
याच आझाद मैदानावर आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संत-महंत, हजारो लाडक्या बहिणीही उपस्थित राहणार आहे. हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.