राज्यात परत एकदा थंडी परतली
बीड – तामिळनाडू राज्यात आलेल्या फें गल चक्रीवादाळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला होता आणि त्यामुळे राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते आणि त्याच बरोबर थंडीचा जोरही कमी झाला होता, परंतु आता राज्यात थंडीच परत एकदा आगमन झाले आणि दिवसा व रात्रीचे तापमानही थंड राहत आहे.
दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात आलेल्या फें गल चक्रीवादाळमुळे अनेक राज्यांना याचा फ टका बसला आणि अनेक ठिकाणी पाऊसही पडला. महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या आणि त्याच बरोबर वातावरणही बदले गेले. राज्यातील अनेक भागात सतत ढगाळ वातावरण राहिले होते आणि सूर्यदर्शनही झाले नाही. या दरम्यान राज्यातून थंडी अचानकपणे गायब झाली आणि चक्क गरमी जाणवत होती. परंतु आता ढगाळ वातावरण निव्वळे आणि थंडीचे आगमन परत झाले आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीने हळूहळू परत एकदा जोर पकडला असून दिवसाही थंडी जाणवत आहे आणि रात्रीच्या वेळी तापमानही अधिक कमालीचे राहत असल्याने थंडी जाणवत आहे.
ढगाळ वातावरणाचा मात्र द्राक्षे, आंबासह इतर फ ळ व पिंकावरही परिणाम पडला असून याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. परंतु थंडीने आता जोर पकडला असून राज्यात हेच वातावरण राहिले तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अधिक थंडी राहिल असे सांगितले जात आहे.