रस्ता अपघातील जखमीना कॅशलेस उपचार – नितीन गडकरी

नवी दिल्ली – रस्ता अपघातामध्ये जर एखादा व्यक्ती जखमी झाला तर यापुढे त्याला कॅशलेस उपचार मिळणार असून सात दिवस किंवा जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत खर्च मिळणार असल्याची घोषणा केंद्रिय भूपृष्ठ वाहतुक आणि राष्ट्रीय महासमार्ग मंत्री नितीन गडकरींनी केली.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी मंगळवारी अनेक राज्यांच्या परिवहन मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर एका नवीन योजनेची घोषणा करताना म्हटले की एखाद्या अपघाताची माहिती पोलिसांना 24 तासाच्या आत मिळाली तर जखमी रुग्णाच्या उपचाराचा सात दिवसारचा खर्च किंवा जास्तीत जास्त दिड लाख रुपयांचा खर्च सरकार करेल. हिट अँड रन प्रकरणातील मृतक झालेल्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये दिले जातील
ते म्हणाले की आम्ही काही राज्यात कॅशलेस योजना प्रायोगिक तत्वावर चालवली होती, या योजनेतील काही त्रूटी आम्हांला समजल्या असून निश्चितपणे यात आम्ही सुधारणा करुत. मागील वर्षी 2024 मध्ये रस्ता अपघातामध्ये 1 कोटी 80 लाख लोकांनी जीव गमविला आहे, तर 30 हजार लोकांचा मृत्यू हा हेलमेट न घातल्याच्या कारणामुळे झाला आहे. या मृतकांमधील 66 टक्के हे 18 ते 34 वयोगाटातील होते.
ते म्हणाले की शाळा व महाविद्यालयातील जाण्या -येण्याच्या धोकादयक प्रवेशद्वावारामुळे जवळपास 10 हजार मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन चालविल्यामुळे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
ते म्हणाले की, भारताचा अॅटोमोबाईल उद्योग चार महिन्यापूर्वीच जपानला मागे टाकून जगातील तिसरा सर्वांत मोठा उद्योग बनला आहे. 2014 मध्ये सरकारने कार्यभार संभाळा तेव्हा हे उद्योग क्षेत्र 7 लाख कोटी रुपयांचे होते आता ते 22 लाखा कोटी रुपयांचे झाले आहे.