कला-संस्कृती

बुध व सूर्याच्या युतीमुळे या राशींना होणार लाभ

अस म्हणतात की ग्रहांची स्थिती मानवी जीवनावर प्रभाव पाडत असते त्यामुळे बुधवारचा दिवस हा खूप महत्वाच ठरत असून बुध ग्रह व सूर्याची या दिवशी युती होणार असून यामुळे काही राशींना याचा लाभ मिळणार आहे. बुध व सूर्याच्या युतीला बुधादित्य असे म्हणतात आणि या युतीचा मेष, कर्क, सिंह, तुळ व मकर या पाच राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. चला तर या युतीचा कोण कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहू
मेष रास – मेष राशींच्या व्यक्तींसाठी बुधावारचा दिवस खूप चांगला राहणार असून या राशींचे व्यक्ती हे सर्वप्रकारच्या आव्हानाचा सामना करु शकतील आणि त्यांनी ठरविलेले सर्व लक्ष्य ते गाठू शकतील. या राशीतील नोकरी करणारे व्यक्ती आपल्या कामातून वरिष्ठाना खूष करु शकतील आणि आपल्या लाभासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न यशस्वी राहतील.
वृषभ रास – या राशीच्या व्यक्तीना आपण ठरविलेल्या लक्ष्यांना प्राप्त करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागेल. राग येत असल्यास त्यामुळे इतरां बरोबर आपले संबंध खराब होवू शकतात यामुळे संयमाने परिस्थितीला संयमाने हाताळा व निर्णय घ्या. आर्थिक दृष्टया या राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप चांगला राहिल. तुम्हांला चांगल्या आणि वाईटमधील अंतर समजण्यास थोडी अडचण होवू शकते.
मिथून रास – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक ठरु शकतो आणि नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी अधिकार्‍यां बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे, तसेच तुम्हांला निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होवू शकतात त्यामुळे महत्वपूर्ण निर्णय घ्याचा विचार टाळावा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तेथे जसे सुरु आहे तसेच सुरु ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचे परिर्वतन करण्याचा विचार करु नये. आर्थिक दृष्टया या राशींच्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला राहिल.
कर्क रास – या राशींच्या व्यक्तींनी सामाजीक व व्यवसायीक क्षेत्रात व्यवहारीक दृष्टीकोन स्विकारणे लाभदायक ठरू शकते. या राशींना अचकान धनलाभा होण्याचे योग जळवून येवू शकतात आणि अशा प्रकारच्या संधी अनेक वेळा निर्माण होवू शकातात. या राशींच्या लोकांच्या मनात अस्थिरता आणि ताण तणाव राहू शकतो यासाठी मन शांतीसाठी या राशींच्या लोकांनी शिवाची पूजा करावी.
सिंह रास या राशींच्या लोकांमध्ये साहस आणि पराक्रमात वाढ होईल आणि यामुळे तुम्ही तुमच्या नोकरी व करीअरमध्ये उंचीवर जावू पोहचाल. तुमच्याकडे असलेल्या बोलण्याच्या कलेमुळे आणि दृढ संकल्पामुळे तुम्हांला कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. लहान प्रवासाचा योग जळवून येईल. तुम्ही तुमच्या खर्चावरही नियंत्रण ठेवण्यात यश मिळवू शकाल.
कन्या – या राशींच्या लोकांनी जोशात येवून कोणताही निर्णय घेवू नये आणि विनाकारण दुसर्‍याच्या भांडणात पडण्या पासून लांब रहावे. तुम्ही तुमच्या पुरत पहाणेच योग्य ठरणार आहे. अनैतिक कामामुळे तुमचे नुकसान होवू शकते. नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमानचाळीसाचा पाठ करावा. आर्थिकस्तरावर आजचा दिवस हा सामान्य असेल.
तुळा रास – या राशींच्या लोकांमधील अंतर्ज्ञान शक्ती आजच्या दिवशी खूप चांगली राहिल. नोकरीतील लोकांसाठी त्यांच्या उच्च अधिकार्‍यांच्या बोलण्याचा खोलवरील अर्थ समजण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्या बाबतीत होणार्‍या घटनांचा पूर्वाभास होईल आर्थिक योजना लाभदायक ठरतील. लॉटरी किंवा शेअर बाजारातून लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – या राशींच्या लोकांना आपले विचार दुसर्‍यांच्या समोर व्यक्त करण्यास संकोच होवू शकतो. भूतकाळातील चूका सुधारुन भविष्यातील योजना करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामा बाबतच्या योजना गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकस्तरावर आजचा दिवस सामान्य असेल परंतु खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन करुन खर्च करणे कधीही लाभादायक ठरेल.
धनू रास – या राशींच्या लोकांमध्ये विचार करण्याची शक्ती आज खूप गतीशिल राहिल. तुम्ही कामा संबंधीचे विचार दुसर्‍याला सांगू शकाल. तुम्ही तुमच्या अंतमनातून हे समजू शकाल की दुसरे लोक तुमच्या योजनावर कशी प्रतिक्रिया देतील. भविष्यात जास्त उत्पन्न व आनंद देणार्‍या योजना तुमची प्राथमिकतामध्ये असेल.
मकर रास – या राशिंच्या लोकांसाठी आध्यात्मिक विकासासाठी आजचा दिवस चांगला आहे. परंतु व्यवसायीक क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे यश मिळणे थोडे अवघड होवू शकते. व्यर्थ वाद विवादापासून लांब राहा यामुळे हे तुमच्या मान सन्मानासाठी चांगले राहिल. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप काही चांगला राहणार नाही परंतु खर्चा खूप जास्त होवू शकतात.
कुंभ रास – या राशींसाठी आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याने महत्वाचे ठरेल. कामकाजामध्ये विपरीत स्थिती निर्माण होवू शकतात यामुळे आर्थिक नुकसान होवू शकतो. मनात उदासनिता राहू शकते व नकारात्मक परिस्थीतीपासून वाचण्यासाठी हनुमानचालीचा पाठ करावा. कोणा बरोबरही वाद होण्याचे टाळावे. लाभाच्या रस्त्यात अडथळा निर्माण होईल.
मीन – या राशींसाठी भावनात्मकदृष्टया आजचा दिवस संवेदनशील राहिल. काही नवीन व्यवसायीक गोष्टी होण्याची शक्यता आहे. आपल्या सहकार्यावर जास्त अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेणे आणि कामकाजावर स्वतः लक्ष ठेवावे. धनाच्या प्राप्तीशी संबंधी योग होवू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button