अपात्र बहिणींचे पैसे सरकार जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी असलेल्या निकषामध्ये न बसणार्या बहिणींची छाननी करुन त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ज्या अपात्र ठरलेल्या बहिणींच्या खात्यात आता पर्यंत जमा झालेल्या सहा हप्यांचे पैसे राज्य सरकार वसूल करणार आहे आणि त्याची कारवाई सुरु केली गेली असल्याचे दिसून आले आहे.
राज्य सरकारने मागील वर्षी रक्षबंधानापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरु केली होती आणि या अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्याचे ठरविले होते व ही योजना सुरु झाली होती. आता पर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात ही रक्कमही जमा झाली होती.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारने ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्यांची पडताळणी करुन त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला त्यातून आता अपात्र ठरलेल्या महिन्यांकडून सरकार ही रक्कम वसूल करणार आहे.
निकष काय आहेत? :
दरम्यान, अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात आली आहे. त्यानुसार, धुळे जिल्ह्यात लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या एका महिलेला मिळालेले 7500 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करावे लागले आहेत. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी देखील होणार आहे.
– तर वार्षिक एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल,तर अपात्र ठरणार.
– आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील.
– ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही..
– या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे.
– ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही.
– कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तर अशा महिला अपात्र ठरतील.
– तसेच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
