महाराष्ट्रातील शिवकालीन 11 गड जागतिक वारसा म्हणून घोषीत

संयुक्त राष्ट्राची शाखा असलेली शैक्षणिक, विज्ञान आणि संस्कृती संघटना (यूनोस्को)ने महाराष्ट्रातील शिवकालीन 11 गडांना व दक्षिण भारतातील तामिळनाडूतील मध्ययुगीन कालखंडातील मराठी साम्राज्याची राजधानी राहिलेल्या जिंजीच्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केले आहे.
महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडांना आता जागतिक वारसा म्हणून घोषीत केले आहे. ज्या शिवकालीन गडांना वारसा म्हणून घोषीत केले आहे त्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधूदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या 11 गडांचा समावेश आहे तर दक्षिण भारतातील तामिळनाडूतील जिंजीचा गडाचाही यात समावेश केल्यामुळे मराठी साम्राज्याशी संबंधीत 12 गडांचा यात समावेश केला आहे.

रायगड आणि राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजाधनीचे ठिकाण होते. राजगड हा गड तर मराठी साम्राज्याची पहिली राजधानी होता . त्यानंतर रायगड बांधला गेला व पुढे हा गड कायमस्वरुपी राजधानीच ठिकाण राहिला आहे.
शिवनेरी हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण राहिले आहे आणि शिवकाळाच्या आधी हा गड बांधला गेला आहे. तो काही काळ अहमदनगरच्या निजामशाहीकडे, पुढे विजापुरच्या आदिलशाहीकडे आणि नंतर मोघलांकडे राहिलेला आहे.
प्रतापगड हा अभेद गड छ.शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे, साल्हेर हा पश्चिम महाराष्ट्रात बांधलेला एक गड आहे.
समुद्रावरील परकिय आक्रमणांना रोखण्यासाठी छ.शिवाजी महाराजांनी कोकणात समुद्रकाठी जे जलदुर्ग बांधले त्यात पहिला सिंधूदुर्ग व नंतरचा विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग होय.
छ.राजारामांच्या कार्यकिर्दीत मोघलांच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांना काही काळ वास्तव्यासाठी जिंजीला जावे लागले. अत्यंत दुरवर्ती असे हे ठिकाण असून छ.राजारामांनी मोघलां विरुध्दच्या संघर्षात या गडाला मराठी राज्यांची राजधानी केली.
पन्हाळा हा एक अभेद गड म्हणून ओळखला जातो. सिद्दीजोहरच्या आक्रमणाच्या वेळी छ.शिवाजी महाराज याच गडावर वास्तव्याला होते.
गडांचे प्रकारही असतात यात जमिनीवर बांधलेल्या गडाला भूईकोट, पाण्याच्या जवळ किंवा पाण्यात बांधलेल्या गडाला जलदुर्ग, डोंगरावर बांधलेल्या गडाला गिरीदुर्ग, झाडांनी वेढलेल्या दाट झाडीत बांधलेल्या गडाला वनदुर्ग असे म्हणतात.
गडा संबंधी अभ्यास करताना गडाची रचना, गडावरील बुरुज, पाणी साठविण्याची जागा, आठरा कारखाने, बारा महल याच बरोबर राजदरबार, सदर, सैन्य ठिकाणे, दारुगोळाची ठिकाणे, घोडयांचा तबेला, राहण्याच्या जागा ज्याला महल असे म्हणतात. याच बरोबर धार्मिक ठिकाणेही आहेत. ज्यात मंदिरांचा समावेश होतो.
या सर्व स्थापत्यांचा अभ्यास आजही इतिहास अभ्यासाकांसाठी पर्वणीच आहे.
महाराष्ट्रातील अनेक गड हे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत परंतु जे अजून चांगल्या स्थितीत आहेत ते टिकून ठेवणेही हा एक प्रकारचा यक्षप्रश्न आहे.
शासना बरोबरच जनतेचेही कर्तव्य आहे की या गडांना जपण्याची जबाबदारी आहे. या ठिकाणी गेल्यानंतर त्याचे पावित्र व इतिहास जपला पाहिजे. तरच या जागतिक वारसाला महत्व येईल आणि जे याचे अस्तित्व टिकून राहिल.
