शनिवारच्या महामोर्चाच्या वेळी बीड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
बीड – मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सहभागी आरोपीना अटक करा या मागणीसह विविध मागण्यासाठी शनिवारी बीड शहरात काढण्यात येणार्या सर्वपक्षीय महामोर्चाच्या वेळी वाहतुक कोंडी होवू नये यासाठी वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
बीड शहरात शनिवार दि.28 डिसेंबर रोजी स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षयी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरात येणार्या वाहनामुळे वाहतुक कोंडी होवू नये व नागरीकांना याचा त्रास होवू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशानुसार वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
शनिवारी बीड शहरात येणार्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले असून यात नगररोडवरुन शहरात जाणार्या वाहनांसाठी आता पर्यायी मार्ग हा नगर रोड (जुना नगर नाका), राजीव गांधी चौक मार्ग आणि शहराच्या बाहेर जाण्यासाठी याच मार्गावरुन पुढे अंबिका चौक मार्गे रिलायंस पेट्रोपंप ते जालना रोड.
तर छत्रपती संभाजीनगरहून येणारे वाहने थेट शहरात न प्रवेश करता ज्यांना पुढे जायचे आहे त्यांनी बीड बायपासवरील महालक्ष्मी चौक ते बार्शी नाकावरील छ.संभाजी महाराज चौक मार्गे पुढे जाता येईल. तर बार्शीमार्गे येणारे वाहन हे छ.संभाजी महाराज चौका मार्गे बीड बायपासवरुन पुढे महालक्ष्मी चौक आणि पुढे जाता येईल.
पूर्व दिशेने बीड शहरात येणारी परळीहून -बीडकडे येणारी वाहतुक बार्शीनाक्याहून वळविण्यात येणार असून ती बीड बायपास-महालक्ष्मी चौक रिलायन्स पेट्रोलपंप मार्गे वळविण्यात आली आहे.
शनिवारी ही वाहतुक व्यवस्था सकाळी 8 ते सांयकाळी 6 वाजे पर्यंत लागू राहिल. याकाळात बंदोबस्तामध्ये सामिल पोलिस दलाची वाहने, रुग्णवाहिका व अग्निशामक दलाची वाहने हे मात्र पूर्वीप्रमाणे मार्गाचा वापर करतील .