विधीमंडळाच अधिवेशन 7 ते 9 डिसेंबर पर्यंत

मुंबई – राज्यात महायुतीच सरकार गुरुवारी स्थापन झाल्यानंतर विधीमंडळाचे पहिले अधिवेशन हे 7 ते 9 डिसेंबर पर्यंत होणार असून यात नवनिर्वाचीत सदस्यांचा सदस्य म्हणून शपथविधी होईल आणि राज्यपालंच अभिभाषण होईल.
राज्यात गुरुवारी महायुतीच सरकार स्थापन झाल असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून भव्यदिव्य समारंभात आझाद मैदानावर पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथविधी कार्यक्रमानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभेच अधिवेशन 7,8 व 9 डिसेंबरला घेण्याची शिफ ारस राज्यपालाना करण्यात आली आहे.
विधीमंडळाच पहिल अधिवेशन 7 तारखेला सुरु होणार असून यामध्ये तिनीही दिवस नवनिर्वाचीत 288 सदस्यांचा शपथविधी होणार आहे आणि 9 तारखेला राज्यपालांच भाषण होणार आहे आणि त्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगता होईल.
राज्यात महायुतीच सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलच अधिवेशन मुंबईत होईल व त्यानंतर लगेच हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे. कारण राज्याच्या परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन हे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान नागपूरला होत असत आणि नुतन सरकार स्थापन झाल्यानंतरच हे पहिलच हिवाळी अधिवेशन असणार आहे.