ताज्या बातम्या

सतत दुसर्‍याचा विचार करणारे व्यक्तीमत्व ः रामराव देशपांडे

आजचा दिवस खरचं खूप खास आहे, कारण आमच्या कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे असणारे शेंडेफळ हणजे माझे सगळ्यात लहान सासरे (माझे काका). आज सेवानिवृत्त होत आहेत. काकांनी 28 वर्षांतील सेवेची घौडदौड यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसे काकांचे बालपण अगदी गरीबीत गेले. आमच्या अण्णांनी त्या काळात 3 मुलांचे शिक्षण पूर्ण केले, त्यांना त्यांच्या
पायावर उभे केले याच खरचं मला खूप अभिमान वाटतो. घरात खायला साधी पिवळीची भाकरी आणि तूरीच वरण असे दिवस होते, अश्या परस्थितीत काकांनी अंबेजोगाईला दहावी पर्यांत शिक्षण पूर्ण केले आणि पुढील पदवीचे शिक्षण गंगाखेड येथे पूर्ण केले. त्यानंतर 1995 साली काकांचे लग्न झाले आणि काळ्या फळ्यावर पांढर्‍याा खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात
रंग भरणार्‍या काकांचे 1997 पासून ज्ञानदानाचे कार्य सुरु झाले. त्यांचा हा प्रवास खरच खूप खडतर होता. शाळेत जाताना – येताना त्यांना असंख्य अडचणी आल्या परंतु नियमांच् या चौकटीत राहून प्रत्येक जबादारी चोखपणे पार पडण्याची त्यांची वृत्ती राहिली आहे.् त्यांनी कित्येक वर्ष तर सायकलवर प्रवास केला. त्यांनी त्यांचे काम, अगिदी चोखपणे, शिस्तीने, प्रामाणिकपणे वक्तशिरपणे पूर्ण केले आहे. त्यांचा कामाच्या बाबतीत असणारा नीटनेटकेपणा, स्वत:ची कामे स्वत: करणे याचा आग्रह .. हे आमच्या सारख्या तरुण पिढीला खरच खूप आदर्शवंत उदाहरण आहे. काकांना पुस्तके, ग्रंथ वाचणे ,
कीर्तन ऐकणे तर कधी मोबाईलवर जुने गाणे ऐकणे व गुनगुनने हे त्यांचे काही आवडीचे विषय… कुठलीही शाळा, महाविद्यालय ही दगड विटांची इमारत नसते तर त्या शाळेचे शिक्षक आणि विद्याथी, कर्मचारी हे त्या शाळेचा आत्मा असतात . आपल्या सहकार्यांच्या प्रति सहकार्याच्या भावनेतून त्यांनी कितीतरी स्नेहाची, आपलेपणाची नाती निर्माण केलेली आहेत.
घरी आलेल्या प्रत्येक माणसाला 1/2 कप तरी चहा घेण्यासाठी काकांनी केलेला प्रेमळ आग्रह.. .. काकांचा हा स्नेही स्वभाव मलाही लाभला असल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजते , की मी देशपांडे घराण्याची सून आहे. आमचे चार पिढ्या एकत्र असणारं कुटुंब हिच आमची ओळख आहे, असे मला वाटते. अजून काकांच्या स्वभावातील उत्तम गुण मला सांगावसा वाटतो, तो म्हणजे झालं गेलं ते विसरून जावून नव्याने, जोमाने उभे राहायचे. याचे उदा. म्हणजे (तुळजापूरला
गेल्यावर आमचा आम्रखंडाचा डबा रिक्षामध्ये विसरून राहिल्यावर काकांनी केलेली गोष्ट) काकांनी तर त्यांच्या नोकरीची जबाबदारी पार पाडली, तशी त्यांच् या कुटुंबाची देखील जबाबदारी खूप यशस्वीरीत्या पार पाडली. मुलांचे शिक्षण पूर्ण केले, त्यांना घडवले , चांगले संस्कार दिले , त्याचीच पावती म्हणजे त्यांची दोन्ही मुले आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत.
खरच काकांनी नेहमीच त्यांचे नातेवाईक , शेजारी, मित्रपरीवार यांना जी काही मदत लागली ती त्यांनी वेळोवेळी केली. काकांचा स्वभाव पाहिलं तर तसं खूप कडक आहे. पण जसं फणस असतं त् याचप्रमाणे माझे काका आहेत. बाहेरून जरी काटेरी वाटत असले तरी आतील भाग (त्याचे गरे) मधाप्रमाणे गोड असतात . काका खूप हळवे आहेत. माझ्या माहेरी ज्यावेळी ते मला न्यायला आले त्यावेळेस त्यांना वाटायचे की, हिच्या आई -वडिलांपासून हिला कसे घेऊन जायचे ? असे माझे हळवे काका मायाळू, प्रेमळ आहेत. या प्रवासात काकांनी पूर्ण जबाबिारी पार पाडली. परंतु मला अजून या एका व्यक्ती बद्दल सांगावेसे वाटते , ते म्हणजे माझ्या काकू (छोट्या सासूबाई).. त्यांचा या प्रवासात सिंहाचा वाटा आहे. नेहमीच काकाच्या पाठिशी अर्धांगिनी म्हणून उभ्या राहिल्या…जणू विठ्ठलाची रुख्मिणीचं…. काकांना सकाळी शाळेत जाताना डब्या
देण्यापासून ते नंतर काकांच्या अनुपस्थितीत घरातील पूर्ण जबाबदारी त्या पार पाडत होत्या. मुलांच्या शाळा, क्लास, आजारपण, पाहुण्यांची ये-जा हे सगळं काकू आनंदाने पार पाडत होत्या व आहेत. खरंतर पुरुषाची सेवानिवृत्ती असते परंतु स्त्रीची सेवानिवृत्ती कधीच नसते. कारण स्त्री नेहमी कुटुंबाच्या जबाबदार्‍या पार पाडत असते. काकां विषयी खूप लिहावेसे वाटते परंतु शेवटी वेळेला बंधन असते..आता तूमच्या सेवानिवृतीच्या काळात अपूर्ण राहिलेल्या आवडी-निवडी पूर्ण करा, तुमचे छंद जोपासा,
कुटुंबासोबत वेळ घालवा… तुम्हांला सेवानिवृतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!! आयुष्याचा हा नवा टप्पा तुमच्यासाठी आनंदाने आणि समाधानाने भरलेला असो व तुमचे पुढील आयुष्य निरोगी व आनंदी असावे, खूप आराम करा आता काका…नेहमीची दगदग नको… आता स्वत:साठी वेळ काढा आणि हसत हसत तुमची सेवानिवृत्ती एन्जॉय करा!!!!
तुमची लाडकी सून,
सौ. अर्चना किशोर देशपांडे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button