पं. ह्रषिकेश महाले दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानीत

पुणे – दादासाहेब फ ाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार या संस्थेच्या वतीने दरवर्षी संगीत व चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या व्यक्तीना दादासाहेब फ ाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार प्रसिध्द गजल व भजन गायक आणि संगीत रचनाकार पं.हृषिकेश महाले यांना प्रदान करण्यात आला.
पुण्यातील स्व.राजीव गांधी सभागृहामध्ये आयोजीत कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेत्री हर्षिता गायकवाड यांच्या हस्ते पं.हृषिकेश महाले यांना दादासाहेब फ ाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार -2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कारा बाबत बोलताना पं. ह्रषिकेश महाले म्हणाले मी अत्यंत भाग्यवान आहे की इतका मोठा पुरस्कार मला लाभला. हा कलेचा सर्वोच्य सन्मान असून मी तो ज्यांच्यामुळे आहे त्या तमाम रसिकांना समर्पित करत आहे.
गेली शेहेचाळीस वर्ष पं. ह्रषिकेश महाले गायन व संगीतकार म्हणून कार्यरत आहेत. आज पर्यंत त्यांच्या 8000 आठ हजारच्या वर गायनाच्या मैफिली भारतात झाल्या आहेत. त्यांना 4 राष्ट्रीय व 69 राज्यस्तरीय व लोकल पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी 700 च्या वर गाणी कंपोज केली असून अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. तसेच त्यांच्या आई स्व. आशा महाले व वडील स्व. रामचंद्र महाले त्यांच्यासारखे गुरु घरातच लाभले व त्यांचे आजोबा कै. वा. वि. कुलकर्णी हे त्यांचे प्रथम गुरु होत. वयाच्या तिसर्या वर्षा पासूनच रियाजाची गोडी लागली. पुढे पदमश्री अनुप जलोटा व पद्माभूषण जगजीत सिंग यांच्याकडून 40 वर्ष मार्गदर्शन गुरु विद्या प्राप्त झाली.
सध्या अनेक शिष्य त्यांच्याकडून शिकत आहेत व पुढे जात आहेत. त्यांच्या पत्नी सौ. पूर्वा महाले यांच्याबरोबर अनेक रचना भजने लोकप्रिय ठरली आहेत. नुकतेच गीतकार गायिका स्वरश्री यांच्याबरोबर घन भरले.. व साजन मोरे.. या रचनाना रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
पुरस्कार सोहळा कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विविध क्षेद्धातील नामवंत, अनेक मान्यवर, गायक व अनेक कलाकार उपस्थित होते.