सामान्यांना लाथ मारणाऱ्या ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याच तातडीने निलंबन करावे -कु. दिपाली मिसाळ

छत्रपती संभाजीनगर शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कु. दिपाली मिसाळ यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मंत्री पंकजाताई मंुडे यांचा ताफा जालन्यात आला असता त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या सामान्य कार्यकर्त्याला उच्च पोलिस अधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा छत्रपती संभाजीनगर शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कु. दिपाली मिसाळ यांनी तिव्र शब्दात निषेध केला असून या पोलिस अधिकाऱ्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे. महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहिर निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना कु. दिपाली मिसाळ म्हणाल्या की, महाराष्ट्रात, देशात आमच्या सोबत काहीही चुकीचे घडणार नाही मात्र, घडल्यास पोलिस बांधव, पोलिस प्रशासन हा ताकदिने आमच्या सोबत उभा राहिल अशी विचारसरणी आज जनतेच्या समाजाच्या मनामध्ये पोलिसांप्रति आहे. मात्र आज आपण बघितल की, जालना जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांची गाडी आडवत ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्यांना फिल्मीस्टाईलमध्ये मारण्याचे काम तेथील पोलीस उपअधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
आज भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाले पण अजून देशाचा शेतकरी, सामान्य माणूस स्वतंत्र मुक्त झाला नाही. कारण तो त्याच्या मागण्या घेऊन उपोषणकरत होता आणि जिल्हात स्वतंत्रदिन निमित्त पालकमंत्री आल्या आसता तो त्याच्या मागण्याच निवेदन देण्यासाठी पालकमंत्री यांच्या कडे जात आसतांना उपोषणकर्त्याला एका पोलीसउपअधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी गाढवासारखी पाठीमागून येऊन उंचउडी घेऊन लाथ मारली आणि त्याला धरून नेल गेलं. विशेष म्हणजे त्यांवेळी त्यांचे कुटूंबिय त्यांच्या साबेत होते. सामान्यांना लाथ मारणाऱ्या, पोलिस अधिकाऱ्याच तातडीने निलंबन करायला हवं.माझी प्रशासनाला विनंती आहे की, या पोलिस अधिकाऱ्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे. महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहिर निषेध करतो.
