‘बुलडोजर’शाहीच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर एकवटले

सर्वसामान्यांची घरे पाडून त्यांना बेघर करणाऱ्या प्रशासाना विरुद्ध आज संभाजीनगरात ‘जन आक्रोश मोर्चा’
‘एक लढा मानवतेच्या रक्षणासाठी’ साठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
गोरगरीब, सर्वसामान्य, हातावर पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांना बेघर करून त्यांचे घर तोडून रस्ते मोठे करणाऱ्या ‘बुलडोजर’शाहीच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर एकवटले असून सर्वसामान्यांची घरे पाडून त्यांना बेघर करणाऱ्या प्रशासाना विरुद्ध आज संभाजीनगरात ‘जन आक्रोश मोर्चा’साठी ‘एक लढा मानवतेच्या रक्षणासाठी’ साठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर आला आहे.
भवानी नगर, चंपा चौक, कैलास नगर, दादा कॉलनी, दत्त नगर येथे सर्वं ठिकाणी काॅर्नर बैठका घेतल्या आहेत. संपूर्ण शहरातील चौका चौकात मार्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. शहराच्या वसाहती प्रत्येकाला जिथे जिथे पोचता येईल तिथे पोहचून महामोर्चा त सामिल होण्याचे अवाहन करण्यात आले. काल रात्री सर्व छत्रपती संभाजीनगरकरांनी रात्र जागून काढली. सर्व भाग पिंजून काढत मोर्चाची तयारी करण्यात आली.
हा लढा स्वाभिमानासाठी.. आपल्या अस्तित्वासाठी..आपली सामाजिक अस्मिता वाचविण्यासाठी,सर्वंसामान्य गोर गरीबांसाठी.. आता नाही तर कधीच नाही…✊🇪🇺अतिक्रमणाच्या नावावर शहरात सुरु असलेल्या हुकुमशाही बुलडोजरशाही विरोधात ८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी जन आक्रोश महामोर्चा✊ त सामान्य ते सामान्य माणूस सर्वं सामान्य, गोर-गरीब, दलित, पिडीत, वंचित, शोषित, मागासवर्गिय, अल्पसंख्यांक, कष्टकरी,कामगारांच्या वसाहती व शहरातील आणि जिल्ह्यातील गायरान जमिनी वाचविण्यासाठी सर्वं सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी हुकुमशाही बुलडोजर कारवाई विरोधात सामिल होणार असल्याचे आवाहन आयोजक – सर्वं धर्मिय,सर्वं पक्षिय, समतावादी,आंंबेडकरवादी, संविधानवादी, मानवतावादी संघटनांनी केले आहे.

‘बुलडोजरशाही’ विरुद्ध रस्त्यावर उतरा -जयश्री शिर्के
या अमानुष बुलडोजर कारवाईत लाखों सर्वं सामान्य गोर-गरीब दलित पिडीत शोषित वंचित मागासवर्गिय अल्पसंख्यांक कष्टकरी बहूजन कामगारांचे घर संसार उध्वस्त करणार्यां व गोर गरीबांवर होणार्या अन्याय अत्याचारा विरोधात ८ ऑगस्ट रोजी शुक्रवार लाखोंच्या संखेने समाजबांधवांनी उपस्थित रहावे .. प्रत्येक स्वाभिमानी निष्ठावान जिगरबाज समाज सेवकांनी नेते कार्य कर्त्यांनी व सामिल होण्यार्यां पक्ष संघटनानी आप आपल्या परीने सोशल मिडीया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अवाहन करावे असे आवाहन जयश्री शिर्के, दिपक निकाळजे, दिपक केदार, प्रिती दुबे, प्रेमलता चंदन, सरस्वती गवारे,योगिता वैष्णव, अक्षता दाभाडे, अंजली शिर्के, सीमा मांडविया, सँडी गुरू, कोमल गुरु, प्रियांका दाभाडे, अस्लम हुसेन, नदीम ममदानी, बंटी सदाशिवे, अविनाश हिवराळे, शुभम खंडागळे, श्री दुबे यांनी केले आहे.
