बीड मधील स्वरगंध गायन विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील स्वरगंध गायन विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. भारतीय संगीत कलापीठ मान्यताप्राप्त असलेले बीड शहरातील एकमेव संगीत विद्यालय असलेले स्वरगंध गायन विद्यालय च्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 8 मार्च रोजी आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन वारे व प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ मनीषा घुगे उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. यावेळी बोलताना डॉक्टर सौ घुगे यांनी सांगितले की मी सुद्धा गायन शिकते आहे त्याचबरोबर इतरही छंद मी जोपासते आहे यासाठी आपण वेळ काढतो आहोत मनुष्याला अनेक कला शिकण्यासाठी एक जन्म सुद्धा पुरत नाही तरी मी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे वाचन हे महत्त्वाचे आहे त्यामुळे ज्ञान संपन्नता येते. यावेळी बोलताना डॉक्टर सचिन वारे यांनी म्हटले की भारतरत्न भीमसेन जोशी यांच्याशी आपला काही काळ संबंध आला त्यामुळे मी गाण्याकडे वळालो अशी कलाही जोपासता आली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय पटवारी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सुवर्णा धुतेकर कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार कुलकर्णी सुमित कुलकर्णी व इतरांनी परिश्रम घेतले. यावेळी गुणवंतांचा सत्कार डॉक्टर वारे व डॉक्टर घुगे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वरगंध विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पूजा जोशी, , रितू पाटील, दीपक धनवे , अशोक चक्रे, विनोद इंकर, सृजना शिंदे, व सय्यद मुजीब यांचा समावेश आहे.