अमेरिका भारताला देणार पाचव्या पीढीचे एफ -35 लढाऊ विमान

वॉशिंग्टन – भारताला हवाई दलासाठी आवश्यक असणार्या पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आता अमेरिका देणार असून एफ – 35 हे लढाऊ विमान देण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर असून त्यांनी भारतीय वेळेनुसार शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्रवती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा केली. यात व्यापार, संरक्षण, अवकाश व इतर मुद्यांवर चर्चा झाली.द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोनीही नेत्यांनी चर्चेतील सहमतीवर माहिती दिली.
यावेळी ट्रम्प यांनी सांगितले की भारताला सर्वांत आधुनिक एफ – 35 हे लढाऊ विमान दिले जाणार आहे आणि यावर दोन्ही देशात सहमती झाली आहे.

का हवे भारताला पाचव्या पिढीचे लढाऊ विमान
भारतीय हवाई दल हे विमानाच्या घटत्या संख्येमुळे चिंती तर आहेच याच बरोबर आपला शेजारील देश चीनने त्यांचे जे -17 हे पाचव्या पीढीचे लढाऊ विमान बनवून हवाई दलाकडे दिले आहे आणि हे लढाऊ विमान स्टेंनलेंस स्टिलने बनविले आहे त्यामुळे ते रडारवर दिसत नाही. भारताकडे असे एकही लढावू विमान नाही त्यामुळे भारत ही कमी अमेरिकेकडून एफ -35 लढाऊ विमान विकत घेवून पूर्ण करणार आहे.

एफ -35 की एसयू-57
भारताला पाचव्या पिढीचे लढाऊ विमान हवे आहे आणि यासाठी भारत स्वताःच विमान तयार करण्याच्या तयारीत आहे परंतु ते विकसीत होण्यासाठी अजून दहा तरी वर्ष लागतील असे म्हटले जात आहे परंतु तोपर्यंत भारतीय हवाईलाची गरज पूर्ण करण्यासाठी इतर देशातून असे विमाने खरेदी करण्याचा विचार सुरु असून यात अमेरिकेच एफ -35 आणि रुसचे एसयू-57 या दोनी विमानाचा विचार सुरु आहे. रुस-यूक्रेन युुध्दामुळे रुस भारताची ही गरज भागवू शकत नाही त्यामुळे भारताने अमेरिकेकडून एफ -35 हे लढाऊ विमान घेण्याचे ठरविले आहे.
